अहिल्यानगर- तालुक्यातील हिंगणगाव येथून ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी एकास अटक केली असून, त्याच्याकडून २ लाख २० हजारांचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. विठठल बबन गांडुळे (वय ४३ रा. देवटाकळी ता शेवगाव जि. अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे.
हिंगणगाव येथून दि. १९ जुलै फिर्यादी एकनाथ दगडु झावरे रा हिंगणगाव ता. जि अहिल्यानगर यांच्या मालकीचा ट्रक्टर कोणीतरी चोरून नेला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तांत्रिक व गोपनीय तपासामध्ये सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना माहिती की वरील गुन्हा विठ्ठल गांडुळे याने केला असून, तो वडगाव गुप्ता भागात आहे.

त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ वडगाव गुप्ता परिसरात सापळा लावून आरोपी विठठल गांडुळे यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ट्रक्टर व एक दुचाकी असा २ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, उपनिरीक्षक मनोज मोंढे, विकास जाधव, सहायक फौजदार राकेश खेडकर, पोलीस अंमलदार गणेश चौधरी, राजू सुद्रीक, सचिन आडबल, देविदास खेडकर, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांच्या पथकाने केली.