राज्यातील सर्वच शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी सुरू केलेले आंदोलन आता संपूर्ण राज्यात पोहचले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कर्जमाफीसाठी त्यांनी पुकारलेले चक्का जाम येत्या गुरुवार दि.२४ जुलै रोजी असून त्यास खा.निलेश लंके यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तशा प्रकारचे पत्र खा. लंके यांनी बच्चू कडू यांना दिले आहे.
राज्यात सध्या तीन पक्षाचे सरकार सत्तेत असून विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या महायुतीचे सरकार सत्तेत आल्यास राज्यातील सर्वच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या आशेने महायुतीच्या भरभरून मते दिली त्यानंतर महायुतीचे बहुमत होऊन तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन करून अनेक महिन्याचा कालावधी उलटला.

मात्र हे सरकार कर्जमाफीबाबत उदासीन असल्याने प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी मुंबई येथे विधान भवनासमोर अमरन उपोषण करून आता कर्जमाफीसाठी राज्यात कर्जमाफी रॅली काढली होती. तरी शासन या बाबत ठोस निर्णय घेत नसल्याने येत्या गुरुवार दि.२४ रोजी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संपूर्ण राज्यात चक्का जाम आंदोलन करण्याचा बच्चू कडू यांनी निर्णय घेतला असून, या चक्का जाम आंदोलनास अहिल्यानगर दक्षिणेचे खासदार नीलेश लंके यांनी जाहीर पाठिंबा दिला असून जाहीर पाठिंब्याबाबतचे तसे पत्र खा. लंके यांनी बच्चू कडू यांना दिले आहे.