मुळा धरण ७० टक्के भरले, धरणातून ३ हजार क्यूसेसने नदीपात्रात सोडण्यात आले पाणी

Published on -

राहुरी- अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणातून यंदा जुलैच्या सुरुवातीलाच पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. काल बुधवारी दुपारी धरण परिचलन सूचीनुसार धरण पाणीसाठा ७० टक्के पर्यंत पोहोचल्या नंतर धरणातून ३ हजार क्यूसेसने काल बुधवारी सर्व ११ दरवाज्यातून मुळानदी पात्रात पाणी सोडले. धरणातून काल जायकवाडीकडे पाणी झेपावल्याने लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

जुलै महिन्यात मुळाचे पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे. मे महिन्यातच यंदा मुळा धरणात अर्धा टीएमसी पाणी अवकाळी पावसाने जमा झाले होते. जून मधील पावसाने विक्रमी कामगिरी केल्याने धरण साठ्यात, झपाट्याने वाढ होत राहिली. यंदा पावसाचे अंदाज सर्वत्र बांधले जात होते.

जून महिन्यात व जुलैच्या सुरुवातीला पावसाने सर्वत्र दमदार बॅटिंग केली. तसेच बॅटिंग मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाली जून अखेर निम्मी भरत आले, पावसाचा जोर कायम राहिल्याने धरण परिचलन सूचीनुसार धरण पाणीसाठा १८ हजार १५० दशलक्ष घनफूट होताच काल दुपारनंतर जलसंपदा विभागाच्या मुळाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते व शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे यांच्या उपस्थितीत काल दुपारी बटन दाबून धरणाच्या सर्व ११ दरवाजांमधून एकूण ३ हजार मुळा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले.

यावेळी मुळा धरणाचे उपविभागीय अभियंता व्ही. डी. पाटील, शाखा अभियंता राजेंद्र पारखे तसेच लाभधारक शेतकरी उपस्थित होते. धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यापूर्वी इशाऱ्याचा भोंगाही वाजविण्यात आला.

याप्रसंगी कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले की, मुळा धरणाच्या लाभक्षेत धरण क्षेत्रात यंदा चांगला पाऊस होत असून धरण परिचलन सूचीनुसार १५ जुलै पर्यंत १८ हजार १५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा कायम ठेवून येणारी पाण्याची अतिरिक्त आवक नदीपात्रात सोडण्यात येत आहे. १५ जुलै नंतर ३० जुलैपर्यंत धरण परिचलन सूचीनुसार धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल. काल सायंकाळी ६ वाजता मुळा धरणाचा एकूण पाणीसाठा १८ हजार १६२ दलघफु इतके असून धरणात कोतुळ येथून ५ हजार ३२७ क्यूसेसने विर्सग सुरु आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!