करंजी- हिंदुत्ववाद्यांनी जवखेडे खालसा, ता. पाथर्डी येथे आज गुरुवार (दि.३) जुलै रोजी पुन्हा आरती केल्यास येथील मुस्लिम कार्यकर्त्यांनी दि.१० जुलै रोजी हजरत पीर बाबा रमजान उर्फ कान्होबाच्या दर्ग्यावर राज्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने चादर अर्पण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जवखेडे प्रकरणाबाबत आदेश डावलून न्यायालयाचा आ. संग्राम जगताप, आ. मोनिका राजळे, स्थानिक सरपंच व अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे मुस्लिम ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील जवखेडे खालसा येथील हजरत बाबा रमजान उर्फ कान्होबाच्या दर्यावर दि.२६ जून रोजी आ. संग्राम जगताप, आ. मोनिका राजळे, हिंदुत्ववादी संघटनेचे नेते सागरभैय्या बेग, सरपंच व काही ग्रामस्थांनी मेसेज व्हायरल करून भगवा झेंडा लावू, असे वक्तव्य केले होते.

वक्फ बोर्डाला पुढील झालेल्या कामकाजाचा संदर्भ देण्यात आला असून, संभाजीनगर येथील वक्फ ट्रिब्युनल समोर सोशल मुकादम नंबर १११/२५ मनाई हुकूम असताना न्यायालयाचा आदेश डावलून अवमान केला, असे मुस्लिम कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. हजरत पीर बाबा रमजान उर्फ कान्होबा या दर्गाचे वक्फ बोर्डाकडे रजिस्ट्रेशन आहे.
तरीही काही लोकांनी दि.२६ जून रोजी आरती केली. तर दि.३ जुलै रोजी पुन्हा येथे काही लोक आरती करणार असल्याचे समजते, त्यामुळे पोलिसांनी संबंधितांना आरती न करण्याच्या सूचना द्याव्यात. अन्यथा मुस्लिम समाजाच्या वतीने (दि.१०) जुलै रोजी दर्यावर चादर चढवण्याचा इशारा देण्यात आला आहे.