राष्ट्रीय सहकार धोरणामुळे भारताच्या प्रगतीत भर पडणार, युवा नेते विवेक कोल्हे यांचे प्रतिपादन

Published on -

कोपरगाव- नुकतेच जाहिर झालेले राष्ट्रीय सहकार धोरण हे देशाच्या प्रगतीत भर घालणारे आणि सहकाराच्या आर्थिक बळकटीसाठी पोषक असल्याची प्रतिक्रिया इफकोचे संचालक तथा युवा नेते विवेक कोल्हे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय स्तरावर सहकारमंत्री अमित शहा यांच्या मार्फत सहकार क्षेत्राच्या उत्कर्षासाठी स्वतंत्र खाते निर्माण करून राष्ट्रीय सहकार धोरण जाहिर केले. ते सहकाराच्या आर्थिक बळकटीसाठी पोषक आहे. ग्रामीण अर्थकारणाचा पाया सहकारी सोसायटीमुळे मजबुत झाला असून त्याच्या व्याप्तीसाठी हे धोरण स्वागतार्ह आहे, असेही कोल्हे म्हणाले.

याबाबत कोल्हे पुढे म्हणाले की, सहकारातुन समृद्धी या दिशेने देशाच्या भविष्याची वाटचाल सुखकर व्हावी, यासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सहकार धोरण नुकतेच जाहिर केले. ते लोकशाही मुल्यांची वृद्धी करणारे आहे. देशात ८ लाख ५० हजार सहकारी संस्थेच्या माध्यमातुन ३० कोटी सभासद शेतकरी कार्यरत आहे. सकल उत्पन्नात सहकाराचा वाटा मोठा आहे. या धोरणातून युवक, महिला, शेतकरी, उद्योजक यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, आत्मनिर्भरता मजबुत करण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावर जाणिवपुर्वक प्रयत्न सुरू आहेत.

राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या स्थापनेमुळे भारतातील शेतकरी व सहकारी संस्था थेट जागतिक मुल्यसाखळीत सहभागी होणार आहे. त्यातुन नैसर्गिक शेतीला चालना देणे, शेतीमाल विक्रीसाठी पॅक्स संस्थांना ई नाम प्लॅटफार्मशी जोडणे, ब्लॉक चैनसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वाढ आदी उपक्रम या नव्या राष्ट्रीय सहकार धोरणातुन रूजले जाणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सहकार क्षेत्राच्या वाढीसाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करून त्यानुरूप सहकार क्षेत्राची सुसंगत ध्येय धोरणे अंमलबजावणी केली. या देशातील सहकार क्षेत्राने जगाला दिशा दाखवून त्यातुन शेतकरी सभासदांसह सर्वांची आर्थिक क्रयशक्ती वाढविण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!