Upcoming IPO: पुढील आठवडा राहील फक्त आयपीओंचा! गुंतवणूकदारांना कमाईची संधी…बघा बरं माहिती

Published on -

Upcoming IPO:- शेअर मार्केटमध्ये प्रत्येक महिन्याला बरेच आयपीओ येत असतात व आणि गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर आयपीओत गुंतवणूक करतात. ऑगस्ट महिन्यामध्ये बाजारात 40 आयपीओची एन्ट्री झाली व त्याच प्रकारे आता सप्टेंबर महिन्यामध्ये देखील जवळपास एसएमई सेगमेंट मधील सात आयपीओ लॉन्च होणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चला तर मग या लेखामध्ये आपण येणारे आयपीओ बद्दल थोडक्यात माहिती बघू.

पुढील आठवड्यात येणारे एसएमई सेगमेंट मधील आयपीओ कोणते?

1- रचित प्रिंट्स- रचित प्रिंट्स आयपीओ हा साधारणपणे 1 सप्टेंबर 2025 रोजी खुला होणार आहे व या आयपीओची साईज साधारणपणे 19.49 कोटी रुपये आहे.

2- ऑप्टिव्हॅल्यू टेक कन्सल्टिंग आणि गोयल कन्स्ट्रक्शन- 2 सप्टेंबर 2025 रोजी मार्केटमध्ये दोन आयपीओ एन्ट्री करतील व यामध्ये एक म्हणजे ऑप्टिव्हॅल्यू टेक कन्सल्टिंगचा आयपीओ असून हा 51.82 कोटी रुपयांचा आहे. तसेच दोन सप्टेंबर रोजी गोयल कन्स्ट्रक्शन 99.77 कोटी रुपयांचा आयपीओ आणणार असून त्याची किंमत प्रति शेअर 259 ते 262 रुपये असणार आहे.

3- ऑस्टर सिस्टम – तसेच तीन सप्टेंबर 2025 रोजी ऑस्टर सिस्टमचा आयपीओ उघडणार असून यामध्ये प्रतिशेअरची किंमत 52 ते 55 रुपयांच्या दरम्यान निश्चित केली गेली आहे. या आयपीओची किंमत 15.57 कोटी रुपये आहे.

4- शर्वय मेटल्स आणि व्हिगर प्लास्ट इंडिया- शर्वय मेटल्सचा आयपीओ देखील तीन सप्टेंबरलाच येणारा असून हा आयपीओ 58.80 कोटी रुपयांचा आहे. त्यामध्ये प्रतिशेयरची किंमत 192 ते 196 रुपये असणार आहे. तसेच याच दिवशी व्हीगर प्लास्ट इंडिया 25.10 कोटी रुपयांचा आयपीओ आणणार असून या आयपीओचा प्राईस लॉट साधारणपणे 77 ते 81 रुपये असणार आहे.

5- वशिष्ठ लक्झरी फॅशन- 5 सप्टेंबर 2025 रोजी वशिष्ठ लक्झरी फॅशनचा आयपीओ येणार असून हा आयपीओ 8.87 कोटी रुपयांचा असणार आहे व याचा प्राईस लॉट 109 ते 111 रुपयांच्या दरम्यान आहे. हा आयपीओ बाजारात 15 सप्टेंबर रोजी लिस्टेड केला जाण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe