नगर – सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात अहिल्यानगरच्या लष्करी जवानाचा जागीच मृत्यू

Published on -

नगर नगर-सोलापूर महामार्गावर वाळुंज गावाजवळ ३१ जानेवारीला दुपारी १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात लष्करी जवानाचा जागीच मृत्यू झाला. साईनाथ इंगळे (रा. पिसोरे, ता.श्रीगोंदा) असे या जवानाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, लष्करात कार्यरत असलेले जवान साईनाथ इंगळे हे सुटीसाठी गावी आलेले होते. कामानिमित्त ते नगर-सोलापूर महामार्गाने मोपेडवरुन नगरकडे येत होते. वाळुंज गावाजवळ पाटबंधारे

विभागाच्या वाहनाने (क्र.एम.एच.१५, एफ. व्ही. ७४५१) त्यांच्या मोपेडला जोराची धडक दिली. या धडकेत डोक्याला मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मयत जवानाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेण्यात आले होते. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe