अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये गुरुवारी २९ हजार १३ क्विंटल गावरान कांद्याची आवक झाली होती. यावेळी कांद्याच्या भाव पडलेले असल्याचे दिसून आले. व्यापाऱ्यांनी केलेल्या लिलावात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल १२०० ते १६०० रुपये भाव मिळाला.
दोन नंबर कांद्याला ८०० ते १२०० रुपये भाव मिळाला. तीन नंबर कांद्याला ४५० ते ८०० रुपये भाव मिळाला. चार नंबर कांद्याला २०० ते ४५० रुपये भाव मिळाला. नगरमध्ये कांद्याला कमीतकमी प्रतिक्विंटल २०० रुपये, तर मध्यम प्रतिचे ९५० रुपये व जास्तीत जास्त १६०० रुपये भाव मिळाला.

अपवादात्मक भाव म्हणून २३ कांदा गोण्याच्या लॉटला प्रतिक्विंटल १८०० रुपये, तर १३६ गोण्यांना १७०० रुपयांचा बाजारभाव मिळाला. दरम्यान कांद्याच्या भावात दोनशे रुपयांनी घट झाल्या शेतकरी चिंतेत आहेत. अनेक शेतकऱ्यांन कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला असून कांद्याचे भाव वाढण्याची ते प्रतीक्षा करीत आहेत