Post Office Scheme:- गुंतवणुकीच्या दृष्टीतून बघितली तर बँक आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांवर गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर विश्वास ठेवतात.यामागील प्रमुख कारण म्हणजे या ठिकाणी केलेली गुंतवणूक सुरक्षित राहते आणि निश्चित परताव्याची हमी या माध्यमातून मिळत असते. बँक किंवा ऑफ पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये जर तुम्ही दीर्घ कालावधीसाठी सातत्यपूर्ण नियमितपणे गुंतवणूक करत गेला तर काही वर्षात लाखो रुपयांचा फंड तुम्ही जमा करू शकता. त्यामध्ये पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजना देखील फायद्याच्या ठरतात. त्यामुळे तुम्हाला देखील सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल व चांगला परतावा मिळवायचा असेल तर आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका योजनेची माहिती देणार आहोत जी तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरेल.
पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना
पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबविण्यात येणारी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ योजना अतिशय महत्त्वाची अशी योजना असून गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहे. यामध्ये कमीत कमी जोखीम, कर सवलतीचा लाभ आणि आकर्षक व्याजदर त्यामुळे ही योजना लोकप्रिय ठरली आहे. सध्या सरकारच्या माध्यमातून या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 7.1% दराने वार्षिक व्याज दिले जात आहे व आयकर दात्यांसाठी देखील ही योजना अनेक अर्थाने फायद्याचे आहे. या योजनेतून मिळणारे व्याज आणि केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे टॅक्स फ्री आहे. म्हणजे योजना परिपक्व झाल्यानंतर जी एकूण रक्कम मिळते ती देखील टॅक्स फ्री असते. या योजनेचा कालावधी पंधरा वर्षाचा आहे. तुम्हाला या योजनेत फक्त पाचशे रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करता येते व जास्तीत जास्त मर्यादा ही 1.50 लाख रुपये इतकी आहे. या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जरी या योजनेचा कालावधी पंधरा वर्षाचा असला तरी देखील तुमची इच्छा असेल तर प्रत्येकी पाच वर्षांकरिता ही योजना दोनदा वाढवता येऊ शकते. सोप्या भाषेत सांगायची झाली म्हणजे या योजनेचा कालावधी पंचवीस वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो.

कसे मिळेल 18 लाख 18 हजार रुपये व्याज?
या योजनेमध्ये कमाल एक लाख 50 हजार रुपये गुंतवता येतात. तुम्ही महिन्याला 12500 बचत केली व ही बचत तुम्ही जर 15 वर्षांपर्यंत सतत गुंतवत गेला तर तुमची गुंतवणूक 22 लाख 50 हजार रुपये होते व यावर तुम्हाला हमखास व्याज हे 18 लाख 18 हजार 209 रुपये मिळते. तुमची एकूण गुंतवणूक आणि त्यावर मिळणारे व्याज असे मिळून एकूण 40 लाख 68 हजार 209 रुपयांचा निधी मिळतो.
या योजनेची इतर वैशिष्ट्ये
या योजनेचे खाते जर तुम्हाला उघडायचे असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत ते उघडू शकतात. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या आपत्कालीन परिस्थिती तुम्हाला या योजनेतून कर्ज देखील मिळू शकते. यामध्ये तुम्ही खाते उघडल्याच्या पहिल्या वित्तीय वर्षानंतर कर्जाची सुविधा तुम्हाला मिळते व खाते उघडायला पाच वर्षे झाल्यानंतर तुम्हाला काही अंशी पैसे देखील करता येतात. त्यामुळे अनेक अर्थानी ही योजना गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरते.