पारनेर- पारनेरची माती ही कसदार साहित्यिकांची खाण असून, येथे दर्जेदार साहित्याची परंपरा लाभलेली आहे, असे प्रतिपादन अहिल्यानगर दक्षिणेचे खा. निलेश लंके यांनी केले.
गटेवाडी येथे झालेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. गटेवाडी येथील नवोदित लेखक अशोक किसन पवार यांनी लिहिलेल्या ‘आणि रामा कलेक्टर झाला’ या कादंबरीचे प्रकाशन खा. लंके व आयकर सहआयुक्त विष्णू औटी यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विजय लोंढे, कारभारी बाबर, दादाभाऊ पवार, सरपंच सौ. मंगलाताई गट, डॉ. संजय बोरुडे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी अशोक किसन पवार यांनी लिहिलेल्या कादंबरीबद्दल खा. लंके यांनी गौरवोद्गार काढले. याच कार्यक्रमात लेखकाच्या आईवडिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. लेखकाचे वडील किसन पवार हे माजी सैनिक असून शौर्यपदक विजेते आहेत. त्यांचा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व जनरल अरुणकुमार वैद्य यांनी विशेष गौरव केला होता. त्यांचा खासदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
एका सामान्य गरीब शेतकरी कुटुंबातील रामा नावाचा तरुण जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर संघर्ष करून कलेक्टर होतो, असे कथानक या कादंबरीतून मांडले असून, ही कथा ग्रामीण तरुणांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्रा. लोंढे यांनी केले. अध्यक्षीय
भाषणात बोलताना आयकर झाले. सहआयुक्त विष्णू औटी महणाले की, रामा कलेक्टर झाला, ही कादंबरी ग्रामीण भागातील यशाला गवसणी घालणाऱ्या शेकडो तरुणांसाठी यशाची गुरुकिल्ली ठरेल.
या वेळी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, पारनेर साहित्य साधना मंचचे प्रमुख कारभारी बाबर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय बोरुडे आदींची भाषणे झाली. सुरवातीला शिवव्याख्याते डॉ. बाळासाहेब शिंगोटे यांचे मातापिता या विषयावर व्याख्यान याप्रसंगी कवी प्रशांत वाघ, अशोक आगळे, कवयित्री गीतांजली वाबळे, कवी संदीप राठोड, डॉ. प्रवीण जाधव, अशोक गायकवाड, मंजुश्रीताई वाळुंज, सुवर्णलता गायकवाड, संतोष गाजरे, सतीश शेटे, बाळासाहेब कापसे, संतोष दुसुंगे, राजेंद्र वाबळे, सुनील पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कादंबरीकार अशोक पवार यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत गट यांनी सूत्रसंचालन केले.