Ahilyanagar News : अहिल्यानगर पोलीस वसाहतीतील घरफोडीची उकल करण्यात तोफखाना पोलिसांना यश मिळाले. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून ८ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. प्रकाश उर्फ मारी रावसाहेब उमाप (वय २४, रा. भोसले किराणा सिध्दार्थनगर, अहिल्यानगर), दुर्गेश दुकानाजवळ, चंद्रकांत चितांमणी (वय २१, रा. नेप्ती नाका, अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, दि. १८ जुलै २०२५ रोजी पोलिस कर्मचारी सुनंदा नरहरी ढाकणे यांनी पोलिस मुख्यालयातील घरी चोरी झाल्याची फिर्याद तोफखाना पोलिस ठाण्यात दिली. १७ जुलै रोजी सायंकाळी घरालाच्या पाठीमागील दरवाजाची आतील कडी कोणीतरी चोरट्यांनी कशाने तरी काढून आतप्रवेश केला. कपाटातील ६८ हजारांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.

यावरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना माहिती मिळाली की, वरील गुन्हा सिदार्थनगर येथील प्रकाश उमाप व त्याच्या साथीदाराने केला आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रकाश उमाप याला सिद्धार्थनगर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने कबुली दिली. चोरीचे सोने बालिकाश्रम रोड त्याचा मित्र दुर्गेश चंद्रकांत चितांमणी याच्याकडे दिल्याचे सांगितले. तत्काळ दुर्गेश चिंतामणी यास अटक करुन चोरीच्या गुन्ह्यातील ८ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक अधिकारी अमोल भारती, मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार योगेश चव्हाण, अविनाश बर्डे, सतिष त्रिभुवन, सतिष भवर, भागवत बांगर, मोबाईल सेलचे पोलिस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांनी यांच्या पथकाने केली.