अहिल्यानगर- तोफखाना पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपोवन रस्तावरील हिंदवी चौकात दोन परप्रांतीय तरुणाना ताब्यात घेऊन गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस, गांजा असा ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाईं सोमवारी दि. १४ दुपारी करण्यात आली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र टटिया बारेला (वय २०), सचिन नानुराम ब्राम्हणे (वय २०, दोघे रा. कोटा किराडी, ता सेंधवा, जि. बडवानी, राज्य मध्यप्रदेश) असे त्यांची नावे आहेत. तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांना माहिती मिळाली की, तपोवन रस्त्यावरील हिंदवी चौकात दोन परप्रांतीय तरुण गावठी कटा व गांजा विक्रीच्या उद्देशाने आले आहेत.

त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे प्रमुख परशुराम दळवी यांनी छापा घालून दोघांना ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत ५२ हजार ५०० रुपयांचा तीन किलो ६६० ग्रॅम गांजा, ३० हजारांचा गावठी कट्टा, एक हजारांचे दोन जिवंत काडतूस असा ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी, पोलिस अंमलदार सुनील चव्हाण, नितीन उगलमुगले, योगेश चव्हाण, अब्दुल इनामदार, भानुदास खेडकर, सुधीर खाडे, सुरज वाबळे, सुमित गवळी, सतीष त्रिभुवन, बाळासाहेब भापसे, सतीष भवर, महेश पाखरे, सुजय हिवाळे, भागवत बांगर यांच्या पथकाने केली.