श्रीरामपूर शहरातील बनावट दारू निर्मितीचा कारखान्यावर पोलिसांची धाड, ४ आरोपींना घेतले ताब्यात

Published on -

श्रीरामपूर- शहरात बनावट दारू निर्मितीचा कारखाना सुरू असल्याने पोलिसांनी काल मंगळवारी अवैध स्पिरीट जप्त केले. अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल दुपारी बाजारतळ आणि खबडी परिसरात ही कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात बनावट दारूची निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून अपर पोलीस अधीक्षक कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करून सदर ठिकाणी छापा टाकला असता, तेथे बनावट दारू तयार करत असल्याचे आढळून आले.

अपर पोलीस कार्यालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल दुपारी शहर परिसरात विविध ठिकाणी कारवाई करत सुमारे अवैध स्पिरीट संबंधित आरोपीकडून जप्त करण्यात आले. श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना श्रीरामपूरात बनावट दारू बनवली जाते, अशी गुप्त माहिती मिळाली होती.

त्यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईत काल हा छापा टाकून अवैध स्पिरीटसह बनावट दारू बनवलेल्या विविध कंपनीच्या दारूच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहे. याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी पोलिसांनी मनोज पवार, शुभम पवार, बाळू फुलारे यांच्यासह एक महिला, अशा तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून बनावट विदेशी दारू आणि दारू बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

४ आरोपींना अटक राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने काल वॉर्ड नं. ३ बाजारतळ आणि वॉर्ड नं. १ खबडी येथून बनावट विदेशी दारू निर्मिती केंद्रावर छापा टाकून अवैध साठा, असा एकूण ७९ हजार ९७० रुपयांचे साहित्य जप्त केले. यावेळी ४ आरोपींना अटक केली असून ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोनसह इतर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने संयुक्त मोहिम राबवून केली. याबाबत पुढील तपास निरीक्षक देशमाने करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!