जामखेड तालुक्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, १० जणांना रंगेहाथ पकडले

Published on -

अहिल्यानगर- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने जामखेडमधील तनेश्वर गल्ली सुरू असलेल्या जुगार अड्डूयावर छापा घालून ९ जणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून एक लाख ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन आश्रुबा रोकडे (वय ५०, रा. आष्टा, ता. आष्टी, जि. बीड), जावेद इस्माईल बागवान (वय ४४, रा. तपनेश्वर रोड, जामखेड, ता. जामखेड), संतोष नवनाथ कदम (वय ४२, रा. कुसडगाव ता. जामखेड), नवनाथ सदाशिव जाधव (वय ३६, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड), विजय विनायक कळसकर (वय ५३, रा. तपनेश्वर रोड, जामखेड), नीलेश लक्ष्मण पेचे (वय ४०, रा. पोकळेवस्ती, जामखेड), जयसिंग विश्वनाथ ढोके (वय ४०, रा. भुतवडा, ता. जामखेड), विठ्ठल मोहन भोसले (वय ३८, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड), विजय गहिनीनाथ जाधव (वय ५३, रा. कर्जत रोड जामखेड) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्याबाबत आदेश केले आहेत. त्यानुसार कबाडी यांनी पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, हदय घोडके, बाळासाहेब गुंजाळ, चंद्रकांत कुसळकर यांचे पथक नेमून अवैध धंद्याची माहिती काढून कारवाईसाठी रवाना केले.

२८ जुलै २०२५ रोजी पथक जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास माहिती मिळाली की, विजय जाधव हा तपनेश्वर गल्ली, जामखेड या ठिकाणी जुगार अड्डा चालवित आहे. त्यानुसार पथकाने तनेश्वर गल्ली येथे छापा घातला असता वरील ९ जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम, ८ मोबाईल, एक दुचाकी असा सुमारे एक लाख ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्ह्याचा तपास जामखेड पोलीस करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!