छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Published on -

अहिल्यानगर- पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील हॉटेल इंद्रायणीच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा घालून १२ जणांना पकडले. त्याच्याकडून रोख रक्कम, मोटारकार, दुचाकी, मोबाईल असा १७लाख ३२ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत सुभाष कुऱ्हाडे (वय २४, रा. गजराजनगर ता. जि. अहिल्यानगर), राहुल लड्डा, (वय ३५, रा. मंगलगेट, अहिल्यानगर), भूषण भगवान धाडगे (वय ३२ रा. पंचवटी कॉलनी भिस्तबाग चौक, अहिल्यानगर), मुस्सा इसा शेख (वय ६०, रा. घासगल्ली, अहिल्यानगर), दिलीप शिवाजी दुसुंगे (वय ४० रा. कापुरवाडी, अहिल्यानगर), जिशान राजू इनामदार (वय ३२, रा. जावेद कॉम्पलेक्स मुकुंदनगर), आस्लम मोहम्मद शेख (वय ५५, रा. हातमपुरा अहिल्यानगर), उमेश किसन कोतकर (वय ४० रा. कांदा मार्केट केडगाव), समिर सैद सय्यद (वय ४७ रा. शिरुर, जि. पुणे), रफिक हसन शेख (वय ३६, रा. बडी मस्जिद जवळ मुकुंदनगर), अल्ताप मुस्ताक शेख (वय ३४ रा. दर्गादायरा मुकुंदनगर), शब्बीर हुसेन खान (वय ६४ रा. मोठी मस्जिद मुकुंदनगर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने २३ जुलै रोजी रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील इंद्रायणी हॉटेलच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने छापा घातला असता १२ जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या ताब्यातून ९२ हजार ९९० रुपयांची रोकड, २ लाख ४० हजारांची १६ मोबाईल व १४ लाखांची लहान-मोठे सहा वाहने असा १७लाख ३२ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई विशेष पथकातील उपनिरीक्षक योगेश चाहेर, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार शंकर चौधरी, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, योगेश भिंगारदिवे, सुनील पवार, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, संभाजी बोराडे, विजय ढाकणे यांच्या पथकाने केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!