भिंगारमधील मावा बनवणारा कारखाना पोलिसांनी केला उद्धवस्त, छापा टाकत ३ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत

Published on -

अहिल्यानगर- भिंगार शहरातील माव्याच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा घालून मावा तयार करणाऱ्या मशिनसह सुगंधीत तंबाखू असा ३ लाख ६२ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केली. ही कारवाई १२ जुलै रोजी भिंगारमधील सदर बाजारातील शौचालयासमोर करण्यात आली. याप्रकरणी दोघे अटक केली असून, दोघे पसार आहेत. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इम्रान शमनूर सय्यद, रियाज रफिक शेख दोघे (रा. सदर बाजार, भिंगार ता. जि. अहिल्यानगर) अशी ताब्यात घेतल्यांची नावे आहेत. रमजान शमनूर सय्यद (रा. काटवण खंडोबा, अहिल्यानगर), शहाबाज शमनूर सय्यद (रा. सदर बाजार, भिंगार) असे पसार झालेल्या दोघांची नावे आहेत. १२ जुलै रोजी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे निरीक्षक जगदीश मुलगीर यांना माहिती मिळाली की, सदर बाजार येथे सुगंधीत तंबाखूपासून मावा बनवून त्याची विक्री होत आहे.

त्यानुसार पोलिस पथकाने १२ जुलै रोजी रात्री सदर बाजारातील शौचालयासमोर छापा छापा घातला असता वरील दोघेजण सुगंधीत तंबाखूपासून मावा बनवित असल्याचे दिसून आले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुबंधीत तंबाखू, सुपारी, मावा तयार करण्याचे मशिन, गुटखा, पावडर असा सुमारे तीन लाख ६२ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल दीपक शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक निसार शेख करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!