अहिल्यानगर- सीताराम सारडा विद्यालयात क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून आठवीच्या मुलाने चाकूने वार करून दहावीच्या मुलाचा खून केला होता. या गुन्ह्यातील चाकू घेऊन त्याने घरी नेवून लपवून ठेवल्याने खून करणाऱ्या मुलाच्या वडिलांला आरोपी केले होते. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार होता. तोफखाना पोलिसांनी त्याला मंगळवारी (दि. १५) मुकुंदनगर परिसरातून अटक केली.
वसिम हमीद शेख (रा. कैलारु कॅम्प, सर्जेपुरा, अ. नगर) असे त्याचे नाव आहे. शहरातील सीताराम सारडा विद्यालयात २५ जून २०२५ रोजी आठवीत शिकरणाऱ्या मुलाने दहावीत शिकत असलेल्या मुलाचा चाकूने वार करून खून केला. ते दोघेही एकाच भागात राहण्यासाठी होते. बाहेर क्रिकेट खेळण्यावरून त्यांचा नेहमी वाद होत होता.

त्याच रागातून चाकूने वार करून खून केल्याचे त्या मुलाने पोलिस तपासात सांगितले होते. खून करणाऱ्या मुलाला त्याचे वडील वसिम शेख याने खुनाच्या घटनंतर मुलाच्या बॅगमधील चाकू घरी नेवून लपवून ठेवला होता.
त्यानुसार त्याला गुन्ह्यात आरोपी करण्यात आले होते. मात्र, तो गुन्हा घडल्यापासून पसार होता. तो पोलिसांना वेळोवेळी हुलकावणी देत होता. त्याचा शोध घेणेकरिता पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र पथक तयार केले होते. १५ जुलै रोजी पोलीस उपनिरीक्षक दळवी यांना माहिती मिळाली की, वसिम शेख हा मुकुंदनगर परिसरात त्याच्या नातेवाईकांकडे येणार आहे.
त्यानुसार पोलिस पकडण्यासाठी सापळा लावला पथकाने वसिम शेख याला होता. पोलिस आल्याची चाहू लागताच तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी व पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार सुनील चव्हाण, अब्दुल कादर इनामदार, योगेश चव्हाण, भानुदास खेडकर, सुमित गवळी, अविनाश बर्डे, सतिष त्रिभुवन, सुजय हिवाळे, कपिल गायकवाड, महेश पाखरे, भागवत बांगर, जिजाबाई खुडे यांच्या पथकाने केली.