श्रीरामपूर- शहरात बेकायदेशीर गोवंश कत्तलीच्या प्रकाराचा मोठा भांडाफोड झाला असून, शहर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल २१०० किलो मांस व अन्य साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे अवैध कत्तलीस आळा बसण्याची शक्यता आहे.
दिनांक ११ जुलै २०२५ रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, श्रीरामपूर शहरातील बिस्मिल्लानगर पाटाच्या कडेला वॉर्ड क्रमांक २ मधील मोसीन ऊर्फ बुंदी इसाक कुरेशी यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये तसेच जैनव मस्जिद जवळील अहिल्यादेवी नगर बंजरंग चौक वॉर्ड क्रमांक २ मधील एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू आहे त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता पाच व्यक्ती गोवंशीय जनावरांचे मांस छोटे छोटे तुकडे करताना व ते मांस वाहनात भरताना आढळून आले.

त्यांनी मोसीन ऊर्फ बुंदी इसाक कुरेशी (वय ३५), शोएब सलीम कुरेशी (वय ३०), अरबाज
अस्लम शहा (वय २३), रिजवान युसुफ कुरेशी (वय ३६) आणि अमजद युनुस कुरेशी (वय ४४ सर्व रा. वॉर्ड क्र. २, श्रीरामपूर) अशी नावे सांगितली. घटनास्थळावरून २१०० किलो गोवंशीय मांस, वाहन व हत्यारे असा एकूण १० लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम हे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकात उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, हेड कॉन्स्टेबल राजू त्रिभुवन, पोलीस नाईक भैरवनाथ अडागळे, कॉन्स्टेबल संपत बडे, अमोल पडोळे, संभाजी खरात, मच्छिद्र कातखडे, अजित पटारे, सचिन काकडे, सागर बनसोडे, आजिनाथ आंधळे, धनंजय वाघमारे, रविंद्र शिंदे, अकबर पठाण, मिरा सरग यांनी सहभाग घेतला.