अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवारी विविध फळांची ३४४ क्विंटल आवक झाली होती. यावेळी मोसंबीला प्रतिक्विंटल ६ हजार रुपये, तर डाळिंबांना १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. दरम्यान, कालच्या तुलनेत डाळिंबांच्या भावात वाढ झाली. संत्र्यांना १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
अहिल्यानगर बाजार समितीत डाळिंबांची ४७ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची २१ क्विंटलवर आवक झाली होती. यावेळी मोसंबीला २००० ते ६००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. सीताफळाची १३ क्विंटलवर आवक झाली होती. सीताफळाला १ हजार ते ६००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. पपईची ७क्विंटलवर आवक झाली होती.

पपईला प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. संत्र्याची २ क्विंटलवर आवक झाली होती. संत्र्याला ४ हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. सफरचंदाची ६ क्विंटलवर आवक झाली होती. सफरचंदाला प्रतिक्विंटल १२ हजार ते २३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. अननसाची ५ क्विंटलवर आवक झाली होती. अननसाला २००० ते ५००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
पेरूची ५० क्विंटल आवक झाली होती. पेरूला प्रतिक्विंटल १ हजार ते ५००० रुपये भाव मिळाला. तोतापुरी आंब्यांची १४६ क्विंटल आवक झाली होती. तोतापुरी आंब्यांना प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपये भाव मिळाला. ड्रॅगनची २३ क्विंटल आवक झाली होती. ड्रॅगन फ्रूटला ७००० ते १२ हजार रुपये भाव मिळाला. केळीची ११ क्विंटलवर आवकझाली होती. केळीला प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये भाव मिळाला. निलम आंब्यांची ४ क्विंटलवर आवक झाली होती. निलम आंब्यांना ३ हजार ते ४ हजार रुपये भाव मिळाला.