पालकांनी शाळेतील भ्रष्टाचार उघड केल्यामुळे मुख्याध्यापिकेने दिला विद्यार्थ्यांना मानसिक त्रास, पंचायत समिती कार्यालयात घंटानाद आंदोलन

Updated on -

श्रीगोंदा- शहरातील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेत पी. एम.श्री. व शालेय पोषण आहारात झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करत कारवाईची मागणी केल्याच्या रागातून शाळेत शिकत असलेल्या दोन लहान मुलींना परिपाठामध्ये सर्व विद्यार्थ्यांसमोर अपमानित करून त्यांना मानसिक त्रास दिल्यामुळे पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेवर कारवाई करावी. यासाठी पालकांकडून पाल्यासह पंचायत समिती कार्यालयात घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेत पी.एम.श्री. व शालेय पोषण आहारात मुख्याध्यापकाने लाखो रुपयांचा केलेला भ्रष्टाचार पालकांनी उघड केला. या रागातून मुख्याध्यापकांनी भ्रष्टाचार
उघड करणाऱ्या टिळक भोस तसेच अरविंद कापसे यांच्या मुलींना शालेय परीपाठामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या समोर अपमानित करून त्यांना मानसिक त्रास दिला.

याबाबत संबंधित मुख्याध्यापकाविरोधात सर्व पुरावे असून देखील पंचायत समिती श्रीगोंदा गटविकास अधिकाऱ्यांसह व गटशिक्षणाधिकारी त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप टिळक भोस यांनी केला. यावेळी सतीश बोरुडे, संदीप साळवे, विलास रसाळ, रामदास नन्नवरे, शिवप्रसाद उबाळे, नाना शिंदे, अरविंद चव्हाण, सुनील ढवळे, गणेश पारे, शाम जरे, सतीश बोरुडे, प्रदीप ढवळे, तौसीम शेख, संदीप साळवे यांच्या सह पालक उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!