आमदार संग्राम जगताप यांना संरक्षण द्या, अन्यथा या जिहादी प्रवृत्तींना धडा शिकवण्याचं काम आम्ही करू, धमकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

Published on -

अहिल्यानगर: जिहादी लोकांना भारताचे संविधान शिकवण्याची गरज आहे. लव जिहाद, वोट जिहाद करीत हिंदू धर्माच्या विरोधात काम करीत आहेत. आम्ही देखील आमच्या धर्माचे काम करीत असून कोणीही आडू शकत नाही. दौंड येथील बादशाह या नावाच्या व्यक्तीला तातडीने पोलिसांनी अटक करावी, अन्यथा आम्ही त्याला घेऊन पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देऊ फेक अकाउंटवर देखील कारवाई करावी अन्यथा अशा जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवण्याचे काम केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर व माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, विनीत पाऊलबुद्धे, अविनाश घुले, अजिंक्य बोरकर, आशाताई निंबाळकर, माणिक विधाते, बाळासाहेब पवार, सुरेश बनसोडे, दीपक खेडकर, रेश्मा आठरे, सागर बोरुडे, साधनाताई बोरुडे, मयुर बांगरे, लतिका पवार, युवराज शिंदे, सनी कोवळे, नितीन घोडके, राजेश भालेराव, श्रेणिक शिंगवी, गिरीश जगताप, महेश गलांडे, अंजली आव्हाड, धीरज उकिर्डे, मारुती पवार, सुंनदा शिरवळे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले की, शहराचे आमदार संग्राम जगताप हे हिंदू धर्माच्या प्रचाराकरिता ठिकठिकाणी सभा मोर्चे व काही ठिकाणी आरत्या करण्याकरिता महाराष्ट्रभर जात असतात. तेथे जात असताना काही ठिकाणी दोन धर्मातील वादविवाद असलेल्या मंदिरांमध्ये हिंदू जनसमुदायासह आरती, दर्शनाकरिता जात असतात. त्यामुळे त्यांना काही विशिष्ट धर्मातील लोकांनी जाणीवपूर्वक टार्गेट केले असल्याचे दिसून येते. त्यामध्ये त्यांनी प्रसार माध्यमांवर त्यांच्या धर्माच्या बाजूने व जाणीवपूर्वक आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात चितावणीखोर वक्तव्ये केली आहेत. त्यामध्ये त्यांनी प्रसार माध्यमांसमोर आमदार संग्राम जगताप यांना आम्ही गर्दीतून गोळी मारू, असे वक्तव्ये केले आहे.

त्यानंतर लगेचच काल आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहायक सुहास शिरसाठ यांना त्यांच्या मोबाईलवर दोन दिवसांत आमदार संग्राम जगताप यांना मारून टाकू अशा आशयाचे टेक्स मेसेज अनोळखी व्यक्तीने केला आहे. तरी आम्ही समस्त सकल हिंदू समाज, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने आपणास निवेदन देतो की, काही विशिष्ट धर्माचे लोक हे जाणीवपूर्वक आमदार संग्राम जगताप यांना टार्गेट करून त्यांच्या जीवाला काही धोका निर्माण होईल, अशी व्यक्तव्ये करीत असून त्या चिथावणीतून आमदार संग्राम जगताप यांच्या जीवितास निश्चितच आता धोका निर्माण झालेला आहे.

त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. आमदार संग्राम जगताप यांची व त्यांच्या कुटुंबीयांची संरक्षणाची जबाबदारी पोलिस प्रशासनाने घ्यावी. त्या करिता लागणाऱ्या आवश्यक उपाय-योजना तातडीने करण्यात याव्या. सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर ज्या अनोळखी व्यक्तीने धमकी दिली त्या व्यक्तीला आणखी कोण मदत करीत आहे, याचा तपास करावा, अशी मागणी निवेद्वनाद्वारे केली आहे.

आमदार जगताप यांना संरक्षण देऊ : घार्गे

सोशल मिडीयाच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे. तसेच, आमदार जगताप यांना योग्य ते पोलिस संरक्षण ही देण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!