कोपरगाव तालुक्यातील वनविभागाच्या वखारीवर धाडी, धडक कारवाईमुळे वखारी व आरामिल चालकांची उडाली धांदल

Updated on -

पुणतांबा- कोपरगाव वनपरीक्षेत्रातील पुणतांबा आणि रुई येथे अवैधरित्या लाकूड कटाई आणि अवैध आरागिरणी चालू असल्याबाबत तक्रारी वाढल्या होत्या. या वाढत्या तक्रारींमुळे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या नेतृत्वाखाली व सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव वनपरिक्षेत्रातील पथकाने पुणतांबामधील वखारींवर नुकतीच धडक कारवाई केली. या कारवाईमुळे वखारी व आरामिल चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणतांबामधील सांगळे वखार येथे लाकूड कटाईचे ढाप यंत्र तसेच बंद अवस्थेतील आरा मशीनसह लिंब, जांभूळ, बाभूळ इत्यादी लाकडांचा माल अवैधरित्या साठवलेला आढळून आला.

रुई येथील सिकंदर शेख यांच्या मालकी गटात दोन ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ताजा लिंब व बाभूळ प्रजातीचा ८.९० घनमिटर लाकूड माल वृक्ष तोड परवाना बंद असूनही सापडलेला आहे.

सदर दोन्ही ठिकाणच्या कारवाई दरम्यान, स्वराज व जॉईंडिअर कपंनीचे दोन ट्रॅक्टर ट्रॉली व त्यातील ८.९० घनमिटर लिंब प्रजातीचे लाकूड, दोन ढाप मशीन, बंद पडलेले आरा मशीन, तीन लाकूड कटर, तराजू काटा जप्त करण्यात आला आहे. जप्त वाहने व माल सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला आहे, असे कोपरगावचे प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी गणेश रोडे यांनी सांगितले. सदर कारवाई यशस्वीतेसाठी कोपरगाव व राहुरी वनपरिक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक, वनमजुरांसह मोठा फौजफाटा यावेळी उपस्थित होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!