Ahilyanagar ZP Bharti : अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियान, पंधरावा वित्त आयोग व राष्ट्रीय आयुष अभियानातील जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक स्तरावरील कंत्राटी पद्धतीने विविध पदांसाठी आरक्षणासह १३७ जागांसाठी भरती करण्यात येत असून या जागांसाठी सुमारे १३३८ जणांचे अर्ज आले आहेत. दरम्यान, पोस्टाने आलेल्या अर्जाची अद्याप मोजणी सुरू असल्याने या अर्जाची संख्या वाढणार आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियानातून वैद्यकीय अधिकारी एमबीबीएसच्या ३१ जागांसाठी ७१ अर्ज आले आहेत. डीपीएम एनएचएमच्या १ जागेसाठी ८ अर्ज, डीस्ट्रीक्ट क्यूए कोऑर्डीनेटरच्या १ जागेसाठी १२ अर्ज, स्टाफ नर्स महिला ४३ जागांसाठी ३०६ अर्ज, स्टाफ नर्स पुरुष २ जागांसाठी १७८ अर्ज, न्यूट्रीशनिष्ट/फिडींग डेमोन्स्ट्रेटरच्या २ जागांसाठी ४ अर्ज, आरबीएसके प्रोग्राम कोऑर्डीनेटरच्या एका जागेसाठी ९ अर्ज, फॅसिलीटी मॅनेजरच्या एका जागेसाठी ६ अर्ज, अकाऊटंटच्या एका जागेसाठी तब्बल ७४ अर्ज असे एकूण ८३ जागांसाठी ६६८ अर्ज आले आहेत.

पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत मेडीकल ऑफीसर एमबीबीएस/बीएएमएस १२ जागांसाठी १५४ अर्ज, एमपीडब्यूच्या २३ जागांसाठी २७२ अर्ज, स्टाफ नर्स महिला १८ जागांसाठी २४१ अर्ज असे५३ जागांसाठी एकूण ६६७ अर्ज आले आहेत. राष्ट्रीय आयुष अभियानातील डिस्ट्रीक्ट प्रोग्राम मॅनेजरच्या एका जागेसाठी तीन अर्ज आले आहेत.
यामध्ये आरक्षणनिहाय एससी, एसटी, एन टी ब, एन क, एनटी ड, एसबीसी, व्हीजे ओबीसी व खुल्या आदी महिला व पुरुष जागांसाठी पदांची भरती होणार आहे. यामध्ये अद्याप पोस्टाने आलेल्या अर्जाचा समावेश नसून त्या अर्जाची मोजदाद अद्याप सुरू असल्याचे जि. प. प्रशासनाने सांगितले आहे. १६ ते २६ जून २०२५ या कालावधीत अर्ज सादर करण्याची मुदत होती