अहिल्यानगर- मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कडक कार्यवाही करुन वादग्रस्त कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव चव्हाण, छावा संघटनेच्या जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख सुरेखा सांगळे, शिव प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष बापू ठाणगे, इंटकचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कर्डीले, वारकरी संघाचे आबा पाचरणे, रिक्षा संघटनेचे दता वामन, गणेश आटोळे, सुनील ठाकरे आदी उपस्थित होते.

प्रशासनाने जर संबंधित आरोपीवर तातडीने कारवाई न केल्यास छावा संघटना व सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.