अहिल्यानगर- अहमदनगर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील संशोधक प्रा. डॉ. अविनाश वंजारे आणि प्रा. प्रशांत कटके तसेच कॅनडामधील शास्त्रज्ञ डॉ. समीर पाध्ये यांनी सह्याद्रीमधून गोड्या पाण्यातील प्राण्याची (क्रस्टेशिया खेकडा, कोळंबी) एक नवीन प्रजाती शोधून काढली. अहिल्यानगर जिल्हा तसेच अहमदनगर महाविद्यालयासाठी हे अभिमानास्पद संशोधन आहे. पालघरमधील जव्हार पठारावर आढळणाऱ्या क्रस्टेशिया गटातील ही प्रजाती आहे. यास ‘फेअरी श्रिम्प’ असेही संबोधले जाते. पाण्यातील हे लहान जलचर प्राणी आहेत आणि ते फक्त पावसाच्या साचलेल्या लहान आकाराची तळी, डबके यामध्ये विशिष्ट करून आढळतात.
या प्राण्यास खास करून जव्हार या भागात आढळल्याने त्यास वारली असे नाव देण्यात आले. स्ट्रेप्टोसेफलस वारली असे या प्राण्याचे नाव आहे. संशोधकांनी हे नाव देऊन या क्षेत्रात राहणाऱ्या जनजातींना (आणि त्यांच्या वारली कलेला) समर्पित केले.

गेली १५ वर्षे अहमदनगर महाविद्यालयातील डॉ. अविनाश वंजारे हे गोड पाण्यातील सजीव तसेच कीटकांचा अभ्यास करत आहेत. अलीकडे पीएचडी करत असताना प्रा. प्रशांत कटके यांच्या सोबत ते संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारच्या सजीवांचा अभ्यास करत आहेत. भारतामधून स्ट्रेप्टोसेफलस या प्राणिवर्गातील मेअर्स यांच्या प्रयत्नांमुळे १९८८ मध्ये पश्चिम घाट जैवविविधता असलेला
ही सातवी प्रजाती आहे.
यापूर्वी सह्याद्री पर्वतरांगेतून पाचगणी, जि. सातारामधून सध्या कॅनडा स्थित शाखज्ञ डॉ. समीर पाध्ये यांनी २०१४ साली सहावी प्रजाती शोधली होती. त्यास त्यांनी स्ट्रेप्टोसेफलस सह्याद्रीएन्सिस असे नाव दिले होते. हे पाण्यातील प्राणी त्यांचे जीवन १५ ते ३० दिवसामध्ये पूर्ण करतात आणि फक्त पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात तयार होतात. जगातील समृद्ध जैवविविधता असलेल्या प्रदेशात पश्मिम घाटाचा आठवा क्रमांक लागतो. वैज्ञानिक नॉर्मन मेअर्स यांच्या प्रयत्नांमुळे १९८८ मध्ये पश्चिम घाट जैवविविधता असलेला अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला.
यामध्येच पावसाने तयार होणारी ही सजीव सृष्टी माळरान, पठार, डोंगराळ भागात तयार होतात आणि अप्रत्यक्षपणे संपूर्ण अन्नसाखळी मध्ये महत्त्वाचे कार्य करतात. या संशोधन साठी बीपीएचईएस चे अध्यक्ष डॉ. आर जे. बार्नबस, प्राचार्य डॉ. नोएल पारगे, उपप्राचार्य तसेच प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. दिलीपकुमार भालसिंग, डॉ. सय्यद रझाक आणि जैवतंत्रज्ञान विभागातील डॉ. सनी रुपवते यांचे सहकार्य लाभले. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांचे ही सहकार्य लाभले. या उल्लेखनीय यशाबद्दल अहमदनगर महाविद्यालयाच्या वतीने डॉ. वंजारे आणि प्रा. कटके यांचा सत्कार करण्यात आला.
नवीन प्रजातीबद्दल माहिती युरोपियन जर्नलमध्ये सादर पश्चिम घाटसारख्या भागात अनेक नवीन प्रजाती असण्याची उच्च शक्यता आहे. संविधानांमधील मूलभूत कर्तव्यामधील सातवे कर्तव्य जंगले, तलाव, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे आणि सजीव प्राण्यांबद्दल करुणा बाळगणे हे आहे, याची जाणीव होताना दिसते, असे संशोधकांनी सांगितले. स्ट्रेप्टोसेफलस वारली या नवीन प्रजातींबद्दलची अतिरिक्त माहिती ‘झूसिस्टेमॅटिक्स अँड इव्होल्यूशन’ नावाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त युरोपियन जर्नलमध्ये सादर केली.