शेवगाव- शेवगाव तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी ९४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षणाची सोडत काल बुधवारी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार आकाश दहाडदे, यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.
या वेळी निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार राजेंद्र बकरे, महसूल सहाय्यक सुरेश बर्डे, श्रीकांत गोरे, आदी उपस्थित होते. यावेळी श्रीकृष्ण बर्डे या बालकाच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठया काढण्यात आल्या. कालच्या आरक्षणाच्या सोडतीत काहींना फटका बसला तर काहींच्या मनाप्रमाणे आरक्षण जाहीर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायतनिहाय जाहीर झालेले आरक्षण पुढील प्रमाणे-
सर्वसाधारण महिला मंगरुळ बु. खुंटेफळ गदेवाडी ढोरसडे, गायकवाड जळगाव, वाडगाव, शेकटे खुर्द, दहिगाव शे., भावीनिमगाव, लाडजळगाव, प्रभुवाडगाव, आखातवाडे, रांजणी, अमरापूर, शेकटे बु., अंतरवाली बु., बालमटाकळी, बक्तरपूर, हिंगणगाव ने. अंतरवाली खुर्द, सुकळी, मडके, ठाकूर पिंपळगाव, कोळगाव, वरखेड, खडके, देवटाकळी, एरंडगाव भागवत, ढोरजळगाव, सर्वसाधारण- माळेगाव ने, मजलेशहर, खामपिंप्री जुनी, मुंगी, आव्हाणे खुर्द, न. बाभुळगाव,
बऱ्हाणपूर, पिंगेवाडी, भगूर, शिंगोरी, भातकुडगाव, दहिफळ नवीन, बोधेगाव, कुरुडगाव, बोडखे, वडुले बु., दादेगाव, वडुले खुर्द, वाघोली, राक्षी, दिवटे, भायगाव, गोळेगाव, घोटण, जोहरापूर, सोनविहीर, कहेटाकळी, खामगाव अनुसूचित जमाती महिला राखीव सामनगाव, अनुसूचित जमाती सर्वसाधारण ढोरजळगाव-ने,
अनुसुचित जातीसाठी आरक्षित महिलासाठी आरक्षित- सालवडगाव, सोनेसांगवी, हसनापूर, दहिफळ जुने, कांबी अ. जाती सर्वसाधारण- मंगरुळ खुर्द, सुलतानपूर बु.राणेगाव, थाटे, कोनोशी. नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित नामाप्र. महिलांसाठी आरक्षित-खामपिंप्री नवीन, मळेगाव शे., विजयपूर, लखमापुरी, नागलवाडी, निवेनांदूर, ताजनापूर, चापडगाव, खरडगाव, वरूर बु., आव्हाणे बु., अघोडी, ठा. निमगाव. नामाप्र सर्वसाधारण लाखेफळ, आखेगाव तितार्फा, बेलगाव, दहिगाव ने. लोळेगाव, तळणी, एरंडगाव समसूद, चेडेचांदगाव, खानापूर, सुलतानपुर खुर्द, शहरटाकळी, हातगाव.