संगमनेर- घराचे बांधकाम करताना अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्याने तालुक्यातील रायतेच्या सरपंच रूपाली गौतम रोहम यांचे ग्रामपंचायत सदस्यपद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द ठरवले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी याबाबतचे नुकतेच आदेश दिले आहे. सदस्यपद रद्द झाल्याने रोहम यांचे सरपंच पदही रद्द झाले आहे. रायते येथील एका तक्रारीनुसार संगमनेर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी समक्ष जाऊन पंचनामा केला. सरपंच रुपाली रोहम या राहत असलेली मिळकत बाबतचा पंचनामा सादर केला.

सदर मिळकत सीताराम रोहम व रत्नमाला रोहम यांचे नावे असून सरपंच रुपाली रोहम यांचे ते सासू सासरे आहे. सरपंच रुपाली रोहम या त्यांचे सासू व सासरे यांच्या मिळकतमध्ये राहत आहे. त्यानुसार अतिक्रमण आढळून आले.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी झाली जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारदाराचा अर्ज मंजूर करून सरपंच रोहम यांचे सदस्यत्व रद्द ठरवले.