अहिल्यानगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण सोडत २३ जुलैला

Published on -

अहिल्यानगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पंचवार्षिक कार्यकाळ २०२५ ते २०३० या कालावधीसाठी हा कार्यक्रम २३ जुलै २०२५ रोजी नियोजित असून, यासंबंधीची माहिती अहिल्यानगरचे तहसीलदार यांनी दिली आहे.

आरक्षण सोडत २३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता, नियोजन भवन, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे पार पडणार आहे. हा सोडत कार्यक्रम तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, यामध्ये सरपंच पदांवरील सर्वसामान्य, मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमातींसाठीचे आरक्षण निश्चित केले जाईल.

याच दिवशी, दुपारी १ वाजता, महिला आरक्षणासाठी स्वतंत्र सोडत आयोजिली जाणार असून, त्याचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर असतील.

तहसील प्रशासनाने ग्रामपंचायतींना सूचना केली आहे की, संबंधित ग्रामसेवक व पदाधिकारी यांनी वेळेत उपस्थित राहून आरक्षण सोडतीला साक्षीदार व्हावे, जेणेकरून प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!