Government Employee News : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी व शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या महिन्यात राज्य शासनाकडून एक अतिरिक्त सुट्टी मंजूर करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात फडणवीस सरकारकडून एक एक्स्ट्रा सुट्टी मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात एक एक्स्ट्रा सुट्टी देण्यात येणार आहे. राज्यात पुढील आठवड्यात एक्स्ट्रा सुट्टी जाहीर करा अशी मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपस्थित करण्यात आली आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा मिळाले आहे. येत्या तीन दिवसांनी महाराष्ट्रात गणपती विसर्जन अर्थात अनंत चतुर्दशी आहे.
अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जना निमित्ताने मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यभर गणेश मंडळांची धूम पाहायला मिळणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणांमध्ये गणेश भक्त लाडक्या बाप्पाचे विसर्जन करणार आहे. या दिवशी गणेश भक्त मोठं – मोठ्या मिरवणुका काढतात. लाडक्या बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक मिरवणुकीत सामील होतात. दरम्यान गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 5 सप्टेंबरला मुस्लिम बांधवांचा मोठा सण साजरा होतोय. या दिवशी मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असतो. या दिवशी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येतात अन जुलूस काढतात.

मुस्लिम बांधवांच्या या मिरवणुकीला किंवा शोभायात्रेला ‘ईद -ए-मिलादुन नबी’चा जुलूस असं सुद्धा म्हटले जाते. म्हणजे मुस्लिम बांधवांसाठी 5 सप्टेंबर चा दिवस अधिक आनंदाचा आणि खास आहे. पण यावर्षी हिंदू-मुस्लीम एकोप्याच्या दुष्टीने अनंत चतुर्दशीच्या एक दिवस आधी हा जुलूस काढण्याऐवजी आठ तारखेला काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या दिवशी जुलूस निघेल त्या दिवशी अर्थात सोमवारी सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी ईद -ए-मिलादुन नबीचे जुलूस 8 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असल्याने या दिवशी राज्य शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता या संदर्भात सरकार नेमका काय निर्णय घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.