श्रीगोंदा- संभाजी ब्रिगेड पक्षाच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे आणि आग्रही पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेली श्रीगोंदा काष्टी -मांडवगण फराटा बस सेवा अखेर सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी व शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. बस सेवेचे काष्टी येथे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ जरे यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष दिलीप वाळुंज, जिल्हा उपाध्यक्ष संजय सोनवणे, तालुका उपाध्यक्ष दिलीप लबडे, मुख्य सचिव सुयोग धस आदी उपस्थित होते.
बस सेवा सुरू करण्यामागे ठोस पाठपुरावा करणारे तालुका उपाध्यक्ष व संपर्कप्रमुख प्रफुल्ल उर्फ बापु जगताप व पांडुरंग खोरे यांनी यावेळी आगारप्रमुख ढवळे यांचे विशेष आभार मानले. आगारप्रमुख ढवळे यांनी स्पष्ट केले की, संभाजी ब्रिगेडच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे व तातडीच्या पत्रव्यवहारामुळे ही सेवा मंजूर होऊन सुरू करण्यात आली आहे. या वेळी श्रीगोंदा येथून नगरसेवक दादासाहेब औटी, सतीश मखरे, अशोक बापू आळेकर, श्रीगोंदा सोसायटीचे व्हा. चेअरमन सूर्यकांत वडवकर हे उपस्थित होते.

काष्टी गावाचे सामाजिक कार्यकर्ते सुनीलराव पाचपुते यांनी संभाजी ब्रिगेडचे आभार मानत म्हटले की, या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रसंगी सागर शिंदे, भाजप नेते डॉ. बाळासाहेब पवार, चंद्रकांत राहींज सर, गणेश गडदे, कोकरे सर, कळसकर सर, सुनील कोकाटे, विठ्ठल कोकाटे, रवी कोकाटे, अॅड. गणेश कळसकर, मनोज दांगट, माऊली वाडगे, दिपक टकले, सुनील शिंदे, सोनटक्के सर आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर दिलेल्या लढ्याला मिळालेला यशस्वी प्रतिसाद ही पक्षाची ताकद असल्याचे वक्तव्य यावेळी करण्यात आले.