श्रीरामपूर- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूर तालुका संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात जावून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना काल बुधवारी देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर नुकताच अक्कलकोट येथे शाईफेक करून भ्याड हल्ला करण्यात आला. हल्ल्याचा सुत्रधार दिपक काटे नावाचा इसम गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून तशा स्वरूपाचे त्याच्यावर गुन्हे दाखल आहे.

त्यांनी केलेला हा हल्ला जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेला होता, असे घडलेल्या प्रसंगातून दिसून येते.
संभाजी बिग्रेड संघटना ही शाहू, फुले, डॉ. आंबेडकर विचारधारा मानणारी आहे. प्रवीण गायकवाड यांच्यावर केलेला हा हल्ला विचारधारेवर केलेला हल्ला आहे. त्यामुळे चळवळीतील कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र झालेल्या आहे.
त्यामुळे संभाजी ब्रिगेडसह या विविध संघटनांच्या भावनांचा विचार करून दिपक काटेसह अन्य आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी. प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष भागडे, तालुकाध्यक्ष ऋषीकेश मोरगे, शहराध्यक्ष संजय बोंबले, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. अरविंद बडाख, नागेश सावंत, बाबासाहेब भांड, अखंड मराठा समाजाचे शहराध्यक्ष सुरेश कांगुणे, संजय गांगड, कुणबी मराठा महासंघाचे दत्तात्रय जाधव, राजेंद्र मोरगे, संभाजी ब्रिगेडचे उत्तर जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे जिल्हाध्यक्ष अशोकराव दिवे, राष्ट्रवादी काँग्रेस श्रीरामपूर शहराध्यक्ष लकी सेठी, काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष आण्णासाहेब डावखरे, ज्ञानेश्वर भंगड, प्रसाद खरात, गोकुळ गायकवाड, शरद नवाळे, बबन नगे, श्रीकृष्ण बडाख, रियाज खान पठाण, अॅड. समीन बागवान, सुधा तावडे, मनोज होंड, प्रवीण लबडे, डॉ. सलीम शेख, कॉ. जीवन सुरूडे, पंडीतराव बोंबले, व्ही. जी. गायधने, गणेश राशिनकर आदी उपस्थितांची नावे आहे.