पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करा, शेवगावच्या सकल धनगर समाजाच्यावतीने निवेदन

Published on -

निंबेनांदूर- पुणे येथील सुनील गोपाळराव उभे या व्यक्तीने फेसबुकवर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याने सदर व्यक्तीवर कारवाईची मागणी करण्यात आली. गोपाळराव उभे या व्यक्तीने फेसबुकवर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याने संपूर्ण धनगर समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकारामुळे राजमाजाप्रती आदर असणाऱ्या समाजभावनेला ठेच बसली असून, यामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ ‘सकल धनगर समाज, शेवगाव’ यांच्या वतीने पोलीस निरीक्षक, शेवगाव यांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अशा प्रकारचे वर्तन भारतीय दंड संहितेनुसार गुन्ह्याच्या श्रेणीत येते व समाजाच्या शांततेला बाधा निर्माण करणारे आहे. त्यामुळे तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधितावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे निवेदन तहसीलदार शेवगाव यांनाही सादर करण्यात आले असून, लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!