अहिल्यानगर- शहरात होत असलेल्या विकास कामांमुळे झालेला बदल हा अनेक मार्गदर्शक मित्रांच्या चांगल्या सूचनांनुसार करत आहे. कमलेश भंडारी यांच्या सारख्या अनेक सहकारी मला साथ देत आहेत. जीवनात अशा चांगल्या मित्रांची गरज असते. अशा चांगल्या मार्गदर्शक मित्रांच्या सहकार्यानेच मी नगरची बदलत्या विकसित स्वरूपाकडे वाटचाल करू शकत आहे. कमलेश भंडारी यांचे सामाजिक कार्य अनुकरणीय आहे. अशा चांगल्या विचारांचा व कार्याचा आदर्श सर्व युवकांनी घ्यावा, असे आवाहन आ.संग्राम जगताप यांनी केले.
भारत भारतीचे राज्य उपाध्यक्ष व मर्चेंट्स बँकेचे संचालक कमलेश भंडारी यांच्या ‘मैत्रीच्या जगातील परीस’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत झंवर, उद्योजक राजेश भंडारी, समाजिक कार्यकर्ते हरजीतसिंग वधवा, माजी नगरसेवक विपुल शेटीया, पोपटलाल भंडारी आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. झंवर म्हणाले, जीवनात पैसा कतीही कमावला तरी कमीच असतो.

या पलीकडे जात कमलेश भंडारी मैत्री जपत राष्ट्राची, समाजाची व आपल्या आई वडिलांची सेवा करत आहे. तो खऱ्या अर्थाने मैत्रीच्या जगातील परीस आहे. हरजीतसिंग वधवा म्हणाले, केवळ जैन समजतच नव्हेतर सर्व समाजात कमलेश भंडारी यांनी प्रेमाचा झरा निर्माण केला आहे. जे कार्य तो हातात घेतो ते पूर्णपणे तडीस नेतोच, अशा शब्दात कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीए किरण भंडारी यांनी केले. सूत्रसंचालन शाम भुतडा यांनी केले. आभार अजित भंडारी यांनी मानले. यावेळी किसन बंग, डॉ. अमित बडवे, डॉ.संजय असनानी, जय आनंद फाउंडेशनचे अध्यक्ष अमित काबरा, सुनील छाजेड, राजकुमार भंडारी, अमित भंडारी, संजय भंडारी, जय आनंद फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
या कॉफी टेबल बुकमध्ये रा.स्व. संघाचे जिल्हा संघचालक वाल्मीक कुलकर्णी, राजाभाऊ मुळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ उद्योजक श्रीगोपाल धूत, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, बडीसाजन ओसवाल श्री संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा, प्रा. सुजित बेडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.