कुकाणा- माझे कार्यालय फिरते आहे. कुणालाही कुठेही भेटतो. शिक्षण व संस्कार हीच वडिलांकडून मला मिळालेली प्रॉपर्टी आहे. जनतेने आमदारकीचे शस्त्र माझ्या हाती दिले असून त्यातून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून चांगला तालुका घडवायचा आहे, असे प्रतिपादन आ. विठ्ठलराव लंघे यांनी केले.
कुकाणा येथे आमदार लंघे, माजी आमदार पांडुरंग अभंग, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांच्या उपस्थित पार पडलेल्या एका कार्यक्रमात आ. लंघे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार -अभंग होते. प्रारंभी अमोल अभंग यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी आमदार लंघे यांनी कुकाणा व जेऊर हैबती ग्रामपंचायत कार्यालय नवी इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी पंचवीस लाखांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, स्थानिक विकास निधीला वर्षभरात काही मर्यादा असल्यातरी मंत्री विखे यांच्या माध्यमातून नियोजन मंडळाकडून निधी मिळवून विकास कामे करू. शासनाच्या योजनाचा लाभ धडाडीने जनतेला मिळवून देणार आहे.
माजी आमदार अभंग यांनी संत ज्ञानेश्वर विकास आराखडा प्रकल्पाबाबत विधानसभा कामकाजात लक्ष वेधल्याबद्दल आमदार लंघे यांचे आभार मानले. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांनी सर्वसामान्यांचा सन्मान करणारा ‘नो शटलमेंट ओन्ली डेव्हलेपमेंट’, असा आमदार लाभल्याचे सांगितले. प्रा. शकूर शेख यांनी सूत्रसंचालन केले. तर अब्दुल शेख यांनी आभार मानले.
यावेळी अशोक चौधरी, कुकाणाच्या सरपंच लता अभंग, लीलाभाभी बरमेचा, डॉ. सपना पवार, अब्दुल शेख, भैयासाहेब देशमुख, बबनराव पिसोटे, अंकुश काळे, काशिनाथ नवले, विजय आव्हाड, यशवंत एळवंडे, संतोष भिंगारदिवे, संजय पवार, माजी सरपंच दौलतराव देशमुख, भाऊसाहेब फोलाणे, अभियंता बाळासाहेब कचरे, विलास देशमुख, किरण शिंदे, गणेश निकम, डॉ. कुलदीप पवार, डॉ. गणेश आर्ले, शंकर भारस्कर, डॉ. बाळासाहेब कोलते, विष्णू पवार, मच्छिद्र कावरे, नवनाथ साळुंके, माजी सरपंच एकनाथ कावरे आदी उपस्थित होते.