अहिल्यानगर- छावणी परिषदेमुळे भिंगार शहराचा विकास खुंटला होता. नागरिक सोयी सुविधांपासून वंचित होते, यासाठी नगर दक्षिणचे तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत भिंगारला स्वतंत्र नगरपालिका करा किंवा भिंगारचा समावेश नगरच्या महानगरपालिकेत करावा, अशी मागणी करीत लोकसभेतही आवाज उठवला होता.
त्यास आता यश आले असून भिंगारला स्वतंत्र नगरपालिका करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भिंगारला शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे.अनिल मोहिते यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, भिंगारमधील छावणी परिषदेमुळे भिंगारच्या विकासात अडथळे येत असून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

ही परिस्थिती बाबत तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे भिंगारला स्वतंत्र नगरपालिका करा किंवा भिंगारचा समावेश नगरच्या महानगरपालिकेत करावा, अशी मागणी करीत लोकसभेच्या अधिवेशनातही केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. डॉ. सुजय विखे यांनी त्यावेळी केंद्र व राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे भिंगारला स्वतंत्र नगरपालिका होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घोषीत केले. ही घोषणा स्वागतार्ह असून भिंगार शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे.
भिंगार भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही वारंवार भिंगारचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे. यामध्ये शहर जिल्हा सरचिटणीस महेश नामदे, यामध्ये भिंगार छावणी परिषदेचे सदस्य वसंत राठोड, भिंगार मंडलाचे अध्यक्ष सचिन जाधव, माजी अध्यक्ष शामराव बोळे, ज्येष्ठ नेते प्रकाश लुनिया, राजेंद्र फुलारे, दामोदर माखिजा, माजी नगरसेविका शुभांगी साठे, रवींद्र बाकलिवाल, प्रकाश रासकर, नीलेश साठे, मयूर जोशी, अनिरुद्ध देशमुख, आप्पासाहेब हंचे, रवी फल्ले, श्रीगोपल जोशी व महेंद्र जाधव पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.