शिर्डी : गुणवत्तेचा अभाव असलेली, निकालशून्य देणारी आणि विद्याथ्यांच्या भविष्याशी थेट खेळ करणारी नीट व जेईई परीक्षांसाठीची काही बोगस ऍप्स आणि स्टडी मटेरियल काही स्वयंघोषित शिक्षणतज्ज्ञांनी बाजारात आणली आहेत.
ही Apps प्रभाव पाडत माथी मारली जात आहेत. या फसव्या मोहजालाला बळी न पडता विद्यार्थी आणि पालकांनी सावध राहून आपले वेळ, पैसा आणि शिक्षणाचे अमूल्य क्षण वाया घालवू नयेत, असे आवाहन शिक्षण क्षेत्रातील समुपदेशक डॉ. भारत सुंडाळे यांनी केले आहे.

राहाता येथे नीट आणि जेईई परीक्षेसाठीच्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या आणि पालकांचे समुपदेशन करताना डॉ. भारत सुंडाळे म्हणाले, “डॉक्टर, इंजिनियर किंवा इतर कोणतेही करि अर साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दर्जेदार आणि संशोधनाधारित Apps किंवा नामांकित संस्थांमध्येच शिक्षण घ्यावे. योग्य मार्गदर्शन करणाऱ्या कोचिंग क्लासेसची निवड करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
अनेक पालक आपल्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपल्या मुलांवर डॉक्टर किंवा इंजिनिअर बनण्याचे दडपण टाकतात. पण विद्यार्थ्यांचा कल क्षमता व योग्य मार्गदर्शन लक्षात घेऊनच त्यांचे करिअर ठरवले गेले पाहिजे. यासाठी नामांकित शिक्षणसंस्था व तज्ञ प्राध्यापकांचा आधार घेणे गरजेचे आहे.
विश्वसनीय संस्थांच्या ऍप्सचा वापर करावा
सुंडाळे म्हणाले की, विद्यार्थी व पालकांनी नेहमी केवळ त्या संस्थांची Apps वापरावीत, ज्यांच्याकडे अनुभवी व तज्ञ प्राध्यापक आहेत, आणि ज्यांची निकालाची परंपरा विश्वासार्ह आहे. नामांकित व दर्जेदार कोचिंग क्लासेसचे Apps वापरणे हेच यशस्वी वाटचालीसाठी योग्य ठरेल.
भोंदू Apps निर्मात्यांचा गोरखधंदा डॉ. सुडाळे यांनी सांगितले की, काही स्वयंघोषित शिक्षण तज्ज्ञांनी बनवलेली Apps केवळ प्रश्न कॉपी-पेस्ट करून बाजारात विकली जात आहेत.
त्यांच्या पाठीमागे ना संशोधन, ना तज्ञ प्राध्यापक, ना दर्जा आहे. अशा व्यक्ती शिक्षणाच्या नावाखाली पालकांची दिशाभूल करून केवळ आर्थिक लाभ मिळवत आहेत. अशा भोंदू Apps मुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी याबाबत अतिशय जागरूक राहावे.