अहिल्यानगर- छावणी परिषदेमुळे भिंगारचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच भिंगारमध्ये नव्याने नगरपालिका करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता भिंगारच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे. लवकरच नव्या नगरपालिकेच्या निवडणुकाही होतील.
या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरून पहिला नगराध्यक्ष हा भाजपचाच झाला पाहिजे, यासाठी आजपासूनच नियोजन करावे. प्रत्येक कार्यकर्त्याने निवडणुकीची तयारी सुरु करावी, मी तुमच्या बरोबर असून भिंगारच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

अहिल्यानगर भारतीय जनता पक्षाच्या भिंगार मंडलाच्या कार्यकारिणीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. पालकमंत्री संपर्क कार्यलयात झालेल्या या कार्यक्रमास शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, सरचिटणीस महेश नामदे, भिंगार मंडल अध्यक्ष सचिन जाधव आदींसह अशोक गायकवाड, धनंजय जाधव, दत्ता गाडळकर व नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते. महेश नामदे म्हणाले, भिंगार मंडलाचे नवे पदाधिकारी नुसते पद न घेता तन मन धनाने झोकून देऊन निष्ठेने पक्षाचे काम वाढवणार आहेत.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भिंगारला विकास निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता भिंगारचा विकास होणार आहे. प्रास्ताविकात सचिन जाधव म्हणाले, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली काम करत भिंगार मांडलाची नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. भिंगार नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी सर्व कटिबद्ध आहेत.
भिंगार मांडलाची नवी कार्यकारणी
अध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष राजू दहीहंडी, रुपेश फल्ले, सुरज देवतरसे, चेतन वसगडेकर, श्रीगोपाल जोशी व अप्पासाहेब हंचे. सरचिटणीस महेश रंगाटे व प्रज्योत लुनिया, चिटणीस सुरेश तनपुरे, कुणाल नागापुरे, सागर फुलारी, विशाल सदलापूरकर, बाळकृष्ण यंबारे व संतोष हजारे, कोषाध्यक्ष बाळासाहेब धाकतोडे, युवा मोर्चा अध्यक्ष भार्गव फुलारे, महिला मोर्चा अध्यक्षा जोत्सना मुंगी, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष नाना घडसिंग व ओबीसी मोर्चा अध्यक्ष सचिन गायकवाड आदींसह सर्व कार्यकारणी सदस्य व निमंत्रित सदस्य.