माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून झालेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्यात

Published on -

संगमनेर ( प्रतिनिधी ) काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात विकासाच्या अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. नाशिक पुणे महामार्गावरील इंजिनिअरिंग कॉलेज गेट समोरील हॉटेल स्टेटस च्या समोर उड्डाणपूल अत्यंत गरजेचा होता. यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 38 कोटी रुपये मंजूर करून घेतले होते आणि त्यातून हे काम अत्यंत वेगाने सुरू असून अंतिम टप्यात आले आहे.

संगमनेर शहरातील वाहनांची वर्दळ कमी व्हावी याकरता माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तत्कालीन दळणवळण मंत्री सी.पी.जोशी यांच्याकडे पाठपुरावा करून 9 किलोमीटर लांबीचा बिना टोल बायपास मंजूर करून घेतला व हा बायपास 2014 मध्येच नागरिकांसाठी खुला केला. यामुळे शहरातील वाहतूक बाह्य मार्गाने वळवली गेली. याचबरोबर घुलेवाडी सुकेवाडी हा बायपास केल्याने अनेक वाहतूक त्या मार्गाने ही वळवली गेली.

याचबरोबर संगमनेर शहरासाठी इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा हॅपी हायवे रस्ता सुशोभीकरणासह पूर्ण करू संगमनेर शहराच्या वैभवात भर टाकली.

घुलेवाडी येथील माझे घर सोसायटी लगत असलेल्या हॉटेल स्टेटस समोर ( नाशिक जंक्शन ) पुणे – नाशिक महामार्गावरून संगमनेर कडे येताना व या महामार्गावर जाताना रस्त्याच्या गुंतागुंतीमुळे हा भाग अपघात प्रवण क्षेत्र झाला होता. या ठिकाणी अनेक अपघात झाल्याने लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय दळण मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे आपल्या वैयक्तिक संबंधातून विशेष पाठपुरावा करून या उड्डाणपुलाच्या कामाकरता 38 कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे.

मात्र एका बाजूचा पूल काही कारणास्तव प्रलंबित राहिला होता. सप्टेंबर 2024 मध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा या कामाकरता पुढाकार घेऊन हे काम सुरू केले. यामध्ये स्थानिकांना सोबत घेऊन त्यांचेही अनेक प्रश्न मार्गी लावले.

आता या नाशिक जंक्शनवर दुसऱ्या बाजूने उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने बायपास सुद्धा तयार करण्यात आले आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण होणार असून हे काम अंतिम टप्यात आले आहे. यामुळे माझे घर सोसायटी सह घुलेवाडी ग्रामस्थ, आदर्श नगर, वेल्हाळे,सायखिंडी, चिकणी,मालदाड या स्थानिक नागरिकांसह नाशिककडे जाणाऱ्या व नाशिक वरून संगमनेरकडे येणाऱ्या नागरिकांची दळणवळणासाठी मोठी सोय होणार आहे.

संगमनेर तालुक्याच्या वैभवात भर घालणाऱ्या या उड्डाणपुलाच्या कामाच्या गतीमुळे स्थानिक परिसरातील नागरिकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे पंचक्रोशीच्या वतीने अभिनंदन केले आहे.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे हा उड्डाणपूल

नाशिक – पुणे चौपदरीकरण महामार्ग लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केला. या महामार्गावर माझे घर सोसायटी जवळ उड्डाणपूल व्हावे ही नागरिकांची मागणी होती. या मागणीची दखल घेऊन आणि अपघात टाळण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी या ठिकाणी मोठा उड्डाण पूल मंजूर केला असून स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडून दिवाळीपूर्वीच त्यांनी या कामाला गती दिली आहे.

येत्या काही दिवसात हा पूल पूर्ण होणार असल्याने आम्ही समाधानी आहोत. असे स्थानिक रहिवासी तुषार गोडगे,निखील गुंजाळ,संतोष पुरी,दिपक पानसरे,संजय रहाणे,रामनाथ सोनवणे,निलेश सांगळे,राजेंद्र पानसरे, मच्छिंद्र ढमाले,अनिल दिघे,रुपेश धारणकर,शरद पानसरे, महेश पानसरे,प्रवीण पानसरे,संजय ढमाले,विक्रम ढमाले आदींनी समाधान व्यक्त केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!