Ahilyanagar Politics : महायुती सरकारकडे राज्य चालवण्याची पात्रता नाही, मनमानी कारभारामुळेे ठेकेदार अडचणीत !

Updated on -

Ahilyanagar Politics : महायुती सरकारने मागील वर्षी कामांचे वाटप मनमानी पद्धतीने केल्याने ठेकेदार अडचणीत आले आहेत. राज्याचे अर्थसंकल्प व कामांचे प्रमाण यातील ताळमेळच सरकारच्या हातातून निघाला आहे.

परिणामी ठेकेदारांची कामे पूर्ण होऊनही त्यांचे बिले निघत नाहीत. अशा परिस्थितीत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा संदर्भ देत माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून या घटनेवर भाष्य करत म्हटले आहे की, ठेकेदारांनी अनेक वेळा थकीत बिलांची मागणी केली, तरीही संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कंत्राटदार हतबल होऊन अन्य मार्गाचा अवलंब करू लागले आहेत. सांगलीतील हर्षल पाटील याचे १ कोटी ४० लाख रुपये इतके बील थकीत होते.

एवढा खर्च करूनही राज्याची स्थिती दयनीय आहे. शहरांची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत. वाहतुकीची स्थिती अंगावर येण्यासारखी आहे. अशा स्थितीतही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘शक्तीपीठ महामार्ग’ उभारण्यासाठी हजारो कोटींचा खर्च करण्यास उत्सुक आहेत.

मग हर्षल पाटीलसारख्या तरुणाच्या आत्महत्येला जबाबदार कोण? असा सवाल तनपुरे यांनी उपस्थित केला. या सरकारकडे राज्य चालविण्याची पात्रता नाही, असा घणाघातही प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!