Ahilyanagar News : नगर तालुका पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या मात्र अनेक दिवसांपासून धुळखात पडेलेल्या मोटारसायकलींच्या मालकांना वेळोवेळी आवाहन करून देखील त्याकडे कोणीही वाहनमालक पोलिस स्टेशनला न आल्याने नगर तालुका पोलिसांनी पुढील सात दिवसात ही सर्व वाहने भंगारात लिलावाने विक्री करून केली जाणर आहेत. यातून येणारी रक्कम शासनास जमा करणार आहोत अशी माहिती नगर तालुका पोलिस स्टेशनचे प्रल्हाद गिते यांनी दिली.
आज पर्यंत वेगवेगळ्या गुन्हामध्ये जप्त करण्यात आलेल्या अनेक कंपनीच्या मोटारसायकली पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र नगर तालुका पोलिस स्टेशन शहरी भागात आहे. त्यामुळे पुरेशी जागा नसल्याने ही वाहने नगर तालुका पोलिस स्टेशन अवारातील मोकळ्या जागेत बरेच वर्षापासुन उघड्यावर पडुन आहेत.

या बेवारस मोटारसायकली बाबत त्या त्या वेळी तात्कालीन तपासी अंमलदार प्रभारी अधिकाऱ्यांनी संबंधित वाहन मालकाचा तपास लावण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला तपास याद्या पाठवुन तसेच वर्तमानपानातुन आवाहन केले आहे, परंतु संबंधीत बेवारस वाहनाबाबत कोणीही हक्क सांगणारा मालक पोलीस स्टेशनला आलेला नाही. त्याच प्रमाणे सदरचा मुद्देमाल स्वतःच्या ताब्यात मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केलेला नाही.
त्यामुळे सदरच्या मोटारसायकली दीर्घ कालावधीपासून बेवारस स्थितीत पोलीस ठाण्याच्या आवारात पडुन आहेत. त्यामुळे बेवारस वाहनांचे इंजिन, चेसी नंबर व आरटीओ नंबर यामध्येही खाडाखोड व बदल असल्यामुळे त्यांच्या मूळ मालकाबाबत काही एक माहिती मिळत नाही. ही वाहने पोलीस ठाणे अवारात उघड्यावर असल्याने उन पावसामुळे गंज लागुन ती खराब होत चालली आहेत.
तसेच सदरची वाहने वापरण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे संबंधीत मुद्देमालाची सात दिवसात भंगारात लिलावाने विक्री करून सदरची येणारी रक्कम शासनास जमा करणार आहोत. अशी माहिती नगर तालुका पोलिस स्टेशनचे प्रल्हाद गिते यांनी दिली आहे.