अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात गुरुवारी डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. बाजार समितीत गुरुवारी ३९९ क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यावेळी सफरचंदाला प्रतिक्विंटल २४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. सीताफळाची २ क्विंटलवर आवक झाली. यावेळी सीताफळाला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये भाव मिळाला.
अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी डाळिंबांची ५४ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची ३० क्विंटल आवक झाली होती. मोसंबीला प्रतिक्विंटल १००० ते ५ हजार रुपये भाव मिळाला. संत्र्यांची ११ क्विंटलवर आवक झाली होती. संत्र्यांना १ हजार ते ११ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. पपईची २१ क्विंटल आवक झाली होती. पपईला ८०० ते २५०० रुपये भाव मिळाला. अननसाची ३ क्विंटलवर आवक झाली होती.

यावेळी अननसाला प्रतिक्विंटल २९०० ते ५००० रुपये भाव मिळाला. सफरचंदाची ४ क्विंटल आवक झाली होती. सफरचंदाला १० हजार ते २४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. पेरूची ३२ क्विंटल आवक झाली होती. पेरूला १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. बदाम आंब्याची १८ क्विंटल आवक झाली होती. बदाम आंब्यांना प्रतिक्विंटल २५०० रुपये भाव मिळाला. तोतापुरी आंब्यांची ११४ क्विंटल आवक झाली. तोतापुरीला प्रतिक्विंटल १२०० ते २७०० रुपये भाव मिळाला. दशेरी आंब्याची ६ क्विंटल आवक झाली होती. दशेरी आंब्यांना प्रतिक्विंटल ३७०० रुपये भाव मिळाला.
जांभळांना मिळाला ८ हजार रुपयांपर्यंत भाव अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी जांभळाची १० क्विंटलवर आवक झाली होती. यावेळी जांभळाला प्रतिक्विंटल ३००० ते ८००० रुपये भाव मिळाला. नीलम आंब्याची २९ क्विंटल आवक झाली होती. निलम आंब्यांना प्रतिक्विंटल २००० ते २८०० रुपये भाव मिळाला. केळीची १७ क्विंटल आवक झाली होती. केळीला प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये भाव मिळाला.