विकासकामांत कुठेही कमी पडणार नाही आ. शिवाजीराव कर्डिले यांचा निर्धार

Published on -

राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने आ. शिवाजीराव कर्डिले यांच्यावर मोठा विश्वास व्यक्त केलेला आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, या म्हणीप्रमाणे आ. कर्डिले यांनी नेहमी सर्वसामान्य जनतेला दिलेल्या शब्दाची पूर्तता केलेली आहे.

जनतेच्या सुख-दुःखात धावून येणारा, विकास कामांचा दिलेला शब्द पूर्ण करणारा लोकप्रतिनिधी म्हणून आ. कर्डिले तीस वर्षांपासून जनतेची सेवा करत असून, यापुढेही त्यांच्या नेतृत्वाखाली रस्ते, वीज, पाणी, या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देऊन मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या वैयक्तिक प्रश्नांचीदेखील सोडवणूक करण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केले.

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील कोल्हेवाडी, खंडोबावाडी, कान्होबावाडी, हनुमानवाडी, लक्ष्मीवाडी, नगर रस्ता या भागातील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न आ. कर्डिले यांनी पाठपुरावा करून या कामाचे इस्टिमेट तयार केले. आता कामाला अंतरिम मंजुरी मिळाल्यानंतर लगेच हा विजेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या वीज प्रश्नासंदर्भात युवानेते अक्षय कर्डिले यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांशी संपर्क साधून तत्काळ काम पूर्ण करण्याचे सांगितले.

त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून करंजी येथील वाडी वस्तीवरील विजेचा प्रश्न आता निकाली निघणार असल्याने माजी सरपंच सुनील साखरे, युवानेते आबासाहेब अकोलकर, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आरोळे, राहुल अकोलकर, लहानू अकोलकर, माजी चेअरमन आसाराम अकोलकर, जेष्ठनेते धोडींभाऊ हजारे, संभाजी महाराज कराळे, अॅड. नितीन अकोलकर, माजी चेअरमन प्रशांत अकोलकर,

युवानेते विश्वास क्षेत्रे, विक्रम अकोलकर, बाबा मोरे, माजी संचालक बबन अकोलकर, गणेश अकोलकर, जगदीश अकोलकर, हिरामण अकोलकर, दादासाहेब अकोलकर, किसन अकोलकर, आदिनाथ अकोलकर, संतोष अकोलकर, दीपक अकोलकर, रामेश्वर अकोलकर, पांडुरंग दुतारे, सुभाष शिंदे,

दिनेश लोहकरे, विक्रम अकोलकर, राजेंद्र शिंदे, रंगनाथ अकोलकर, अंबदांस शिंदे, भाऊ मोरे, संदीप क्षेत्रे, आकाश शिंदे, रामजी अकोलकर, शशी अकोलकर, विठ्ठल लोहकरे, दीपक अकोलकर, दत्तात्रेय अकोलकर, प्रकाश क्षेत्रे यांच्यासह करंजी, कान्होबावाडी, खंडोबावाडी, कोल्हेवाडी, हनुमानवाडी, लक्ष्मीवाडी या परिसरातील शेतकऱ्यांनी अक्षय कर्डिले यांचा सन्मान केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!