अहिल्यानगर- जिल्हा हे संतांची भूमी म्हणुन ओळखले जाते. तसेच या जिल्हाला ऐतिहासिक वारसा देखील लाभलेला आहे. जिल्हयात शिर्डीचे साई बाबा मंदिर, सिद्धटेक येथे सिद्धीविनायक मंदिर, पाथर्डी तालुक्यातील श्री वृद्धेश्वर मंदिर, चैतन्य कानिफनाथ महाराज यांची संजीवन समाधी श्री क्षेत्र मढी येथे आहे.
मोहटा येथील जगदंबा देवीचे मंदिर, रतनवाडी येथील श्री भगवान शंकराचे देवस्थान पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर लेणी, कायगाव टोका येथील श्री सिद्धेश्वर मंदिर, जगाच्या नकाशावर प्रसिद्ध पावलेले श्री क्षेत्र शनि शिंगणापूर, संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावन नेवासा नगरी व पैस खांब मंदिर प्रसिद्ध मोहिनीराज मंदिर नेवासे व याचं नेवासा नगरी पासून जवळच अवघ्या १३ किमी. अंतरावर व अहिल्यानगर पासून ६६ किमी अंतरावर संभाजीनगर महामार्गावर अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या तीरावर वसलेले श्री क्षेत्र देवगड म्हणजे या भूतलावरील जणूकाही स्वर्गच!

बालब्रह्मचारी परमपूज्य भास्करगिरी महाराज यांचे देवगड येथील निस्वार्थ सेवेला पन्नास वर्षे पूर्ण होऊन गेलेले आहेत श्री क्षेत्र देवगड या धार्मिक क्षेत्राच्या विकासामध्ये परमपूज्य भास्करगिरी महाराज यांचा मोलाचा वाटा आहे. अतिशय शांत, निर्मळ, स्वच्छ परिसर, निसर्गरम्य, पवित्र व पावन तीर्थक्षेत्र या भूतलावरील जणूकाही स्वर्गच! श्रीक्षेत्र देवगड या तीर्थक्षेत्राचे नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात व भारत देशात नावारूपाला आलेले आहे.
संपूर्ण देवगड मंदिराची वास्तू अत्यंत देखणी असून प्रामुख्याने श्री दत्त मंदिर संपूर्ण बांधकाम हे संगमरवर असून मंदिरात चार फूट उंचीचा सोन्याचा कळस आहे. येथील वातावरण हे अतिशय मंगलमय व पवित्र आहे. या मंदिराच्या परिसरात श्री शनी महाराज, श्री मारुती, ओम चैतन्य श्री मच्छिद्रनाथ, श्री गोरक्षनाथ, श्री मार्कंडेय स्वामी, श्री सिद्धेश्वर, माता पार्वती, श्री गणेश व श्री कार्तिक स्वामी व श्री दत्त मंदिर आहे. तसेच भुयारामध्ये तपस्वी बाल ब्रह्मचारी प.पूज्यनीय किसनगिरी महाराज यांचे समाधी स्थान आहे. मंदिराच्या मागील बाजूला अमृतवाहिनी प्रवरा नदी वाहते व या नदीवरच भक्कम असा घाट बांधलेला आलेला असून नौकानयनाची व्यवस्था उपलब्ध आहे.
प.पूज्य भास्करगिरीजी महाराज – बाबाजी २२ जून ला पंढरपूरला श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेले होते. व द्वादशीच्या दिवशी म्हणजे २३ जून रोजी बाबाजी भिस्तबाग येथील किसनगिरी नगरीमध्ये दत्तधाम येथे दुपारी ३:३० च्या दरम्यान अचानक पाहोचले येताना पांडुरंगाला भोग चढवलेला लाडूचा प्रसाद घेऊन आले. ही वार्ता समजताच पटापट १०० ते १५० भाविक बाबाजीच्या दर्शनाला जमा झाले.
सर्वांनी बाबाजीचे दर्शन घेतलले. बाबाजीनी सर्वांची विचारपूस केली. पांडुरंगाच्या चरणी द्वादशीच्या दिवशी भोग चढवलेला लाडूचा प्रसाद बाबाजीच्या हस्ते भक्तांना मिळणे म्हणजे अहो भाग्यमच नव्हे का? आपल्या भक्ता प्रति, शिष्यांन प्रति असलेले प्रेम, दया, करुणा, आत्मीयता ही बाबांच्या ठाई आपणास दिसून येते व हा प्रसंग बघून मन गहिवरून येते. जसे आई आपल्या मुलांना सोडून गावाला जाते व येताना आपल्या मुलांकरीता प्रेमापोटी आवडीचा खाऊ आणते. अगदी तसेच बाबाजी आपल्या भक्तांप्रती हा महाप्रसाद आणला आणि अहो आश्चर्यमच म्हणावे असे घडले. दर गुरुवारी नियमित वारी असताना एक
प्रकारची ताकत, ऊर्जा, आनंद, उत्साह प्राप्त होतो. प्रवासात मनाला आल्हाददायक व प्रेरणा देणारे विचार आपसुकच मनः पटलावर उमटतात व ६५ ते ७० किमीचा प्रवास अहिल्यानगर पासून ते देवगड हे अंतर कसे निघून जातो ते कळतही नाही.
मनालाही श्रीगुरुचे दर्शनाची आस लागलेली असते. श्री क्षेत्र देवगड येथील पवित्र पावन भूमीत पाऊल ठेवल्यावर मनाला अलौकिक आरोग्य, सुख, शांती व समाधान प्राप्त होते व मनस्वी आनंद होतो. जेव्हा श्रीगुरू भास्करगिरी महाराज यांचे पवित्र दर्शन होते, तेव्हा मनाला खूप मोठी ऊर्जा मिळते. महाराजांनी आत्मीयतेने केलेले विचारपूस दर्शन झालं का? असे विचारून केलेले स्मित हास्य हृदयावरती आपुलकी, आत्मीयता, प्रेम, दया व आशीर्वाद याचे पडसाद उमटल्याशिवाय राहत नाही. अशा वेळी भाविक बाबांच्या प्रति असलेले भक्तीरसात चिंब होऊन आशीर्वादाने भरभरून भारावल्याशिवाय राहत नाहीत.