कोरडगाव- पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील ग्रामपंचायत ही परीसरातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असुन कोरडगाव येथील लोकसंख्या जवळजवळ सहा हजाराच्या आसपास पोहचलेली असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार मोठा आहे.
त्यामध्ये ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे दोन गावचा कार्यभार असल्याने पुर्ण वेळ गावांसाठी देता येत नाही जे दिवस गावांसाठी निवडलेले आहेत. त्या पैकी ग्रामसेवक एकही दिवस हजर राहत नाही असे काम कोरडगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या पाच ते सहा वर्षापासुन चालु आहे.

परंतु सध्या जुलै २०२५ पासुन शंकर दातीर हे ग्रामसेवक म्हणुन बदलुन आलेले आहेत, परंतु कोरडगावचा कारभार मोठा असल्याने व त्यांच्याकडे दोन गावचा पदभार असल्याने गावच्या विकास कामात अडथळे निर्माण होत आहे. तसेच ते ग्रामपंचायतीच्या कामासाठी पुर्णवेळ देत नाहीत, त्यामुळे कोरडगाव ग्रामपंचायतीचा कारभार चालवण्यात अडथळा ठरत आहे तरी कामात अडचणी निर्माण होत आहेत.
तरी सात दिवसांत कोरडगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दातीर यांची बदली करून आम्हाला स्वतंत्र ग्रामविकास अधिकाऱ्यांची नेमणुक करावी. अन्यथा तसे न झाल्यास दि.८ ऑगस्ट रोजी कोरडगाव येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन कोरडगावचे सरपंच रविंद्र म्हस्के यांनी मा. गटविकास अधिकारी पालवे मॅडम, पंचायत समिती पाथर्डी यांना दिले. यावेळीपोपट वारे, सोपान भिंगारे, सुरेश पठारे, सुनिल जाधव, पंकज कुटुंबे, विशाल धनवटे आदी हजर होते.
– मैनाबाई पवार, ज्ञानेश्वर वायकर,