संगमनेरात दुर्दैवी अपघात ! नाशिकच्या महिलेचा अपघातात मृत्यू, पती गंभीर जखमी

Published on -

संगमनेर :तालुक्यातील शिबलापूर- संगमनेर या रस्त्यावर मोटारसायकल व टाटा झिपचा भिषण अपघात होऊन या अपघातात नाशिक येथील एका महिलेचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी रस्त्यावर दुपारी ३ वाजण्याचा सुमारास शेडगाव फाट्यावर हिरो कंपनीची मोटारसायकल- टाटा झिप यांची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात मोटारसायकलवरील अलका भाऊसाहेब वय ४५, रा. चास नळवाडी, नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला, भाबड तर भाऊसाहेब नारायण भाबड (वय ५१) हे गंभीर जखमी झाले आहेत.

यावेळी अपघातातील गंभीर जखमीस उपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.प्रत्यक्षदर्शींनुसार, शेडगाव फाट्याजवळील रस्ता अरुंद असून, वाहतुकीचा वेगही वाढलेला असतो.

याच ठिकाणी हिरो कंपनीची मोटारसायकल आणि टाटा झिप यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेनंतर दोघेही रस्त्यावर दूर फेकले गेले. अलका भाबड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर भाऊसाहेब भाबड हे गंभीररीत्या जखमी झाले.या अपघातामुळे भाबड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!