अहिल्यानगर बाजार समितीत भाजीपाल्याच्या दरात वाढ; वांगे, कारले, दोडका आणि शेवग्याच्या शेंगा महागल्या

अहिल्यानगर बाजार समितीत वांगे, कारले, दोडका आणि शेवग्याच्या शेंगांचे दर झपाट्याने वाढले. टोमॅटोच्या भावात घसरण तर पालेभाज्यांना स्थिर दर मिळाले. लसूण व गवारीनेही १० ते १३ हजार रुपयांपर्यंतची कमाई केली.

Published on -

Ahilyanagar News: अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवारी २०९५ क्विंटल विविध भाजीपाल्याची आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ४५८ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपये भाव मिळाला. यापूर्वी टोमॅटोचे भाव २५०० पर्यंत गेले होते. परंतु आठ दिवसांपासून टोमॅटोच्या भावात घसरण होत आहे. वांगे, दोडके, कारल्याच्या भावात वाढ झाल्याचे दिसून आले.

पालेभाजांची मोठी आवक

अहिल्यानगर बाजार समितीत सोमवारी पालेभाजांची मोठी आवक झाली होती. यामध्ये मेथीच्या ८२११ जुड्यांची आवक झाली होती. मेथी जुडीला ५ ते १५ रुपयांपर्यंत भाव मिळाला. कोथिंबिरीच्या १४ हजार ४०५ जुड्यांची आवक झाली. कोथिंबिरीच्या जुडीला ५ ते १५ रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेपूच्या २९४० जुड्यांची आवक झाली होती. यावेळी शेपू भाजीच्या जुडीला ५ ते १५ रुपयांपर्यंत भाव मिळाला. पालकच्या ४७७ जुड्यांची आवक झाली होती. पालक भाजीच्या जुडीला १० ते १२ रुपये भाव मिळाला. टोमॅटोची ४५८ क्विंटल आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपये भाव मिळाला. वांग्यांची ३२ क्विंटल आवक झाली होती.

वांग्याला ७५०० हजारांपर्यंत भाव

वांग्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ७५०० रुपये भाव मिळाला. काकडीची १४८ क्विंटल आवक झाली होती. काकडीला प्रतिक्विंटल ५०० ते २५०० रुपये भाव मिळाला. गवारीची १५ क्विंटल आवक झाली होती. गवारीला ७००० ते १३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. फ्लॉवरची ४ क्विंटल आवक झाली होती. फ्लॉवरला १००० ते ५००० रुपये भाव मिळाला. कोबीची १४३ क्विंटल आवक झाली होती. कोबीला ५०० ते २००० रुपये भाव मिळाला.

शेवग्याच्या शेंगांना मिळाला १० हजार रुपयांपर्यंत भाव

बाजार समितीत बटाट्याची ४२० क्विंटलवर आवक झाली होती. बटाट्याला प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये भाव मिळाला. हिरव्या मिरचीची ६८ क्विंटलवर आवक झाली होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. लसणाची ३५ क्विंटल आवक झाली होती. लसणाला प्रतिक्विंटल ३००० ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवग्याची ३२ क्विंटलवर आवक झाली होती. शेवग्याला प्रतिक्विंटल ५००० ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!