Loan Moratorium: कर्जाचे हप्ते थांबवायचे आहेत? लोन मोरेटोरियम पर्याय ठरेल का फायद्याचा? वाचा माहिती

Published on -

Loan Moratorium:- जीवनामध्ये बऱ्याचदा काही कारणामुळे अचानकपणे पैशांची गरज भासते व खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही वेळा असे होते की आपण कर्ज घेतलेले असते व आपण नियमितपणे कर्जाचे हप्ते भरत असतो. परंतु नोकरी गेली किंवा इतर काही आर्थिक परिस्थिती उद्भवली तर मात्र कर्जाच्या हप्ते भरणे कठीण जाऊ लागते. अशावेळी मात्र खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. परंतु या परिस्थितीमध्ये तुम्हाला लोन मोरेटोरियम हा पर्याय फायद्याचा ठरू शकतो. हा पर्याय वापरून तुम्ही तुमचा कर्जाचा हप्ता काही कालावधीसाठी थांबवू शकतात. म्हणजे तुम्हाला काही कालावधीसाठी हप्त्यापासून दिलासा मिळू शकतो.

लोन मोरेटोरियम म्हणजे काय?

लोन मोरेटोरियम हा पर्याय वापरून तुम्ही काही कालावधीसाठी तुमचा कर्जाचा हप्ता थांबवू शकतात. या पर्यायांमध्ये बँक कर्जदाराला काही अडचणीमुळे हप्ता थांबवण्याची परवानगी देतात. परंतु या पर्यायात मात्र व्याज हे सुरूच राहते व पर्यायाने कर्जात वाढ होत राहते. सोप्या शब्दात सांगायचे म्हटले म्हणजे या पर्यायांमध्ये तुमच्या कर्जाच्या हप्त्यांची थकबाकी माफ केली जात नाही. ते फक्त काही कालावधीसाठी पुढे ढकलली जाते. आर्थिक परिस्थिती ठीकठाक झाल्यानंतर तुम्ही तुमच्या कर्जाचे हप्ते भरणे सुरू करू शकतात. परंतु भविष्यामध्ये तुमच्यावर मोठा आर्थिक बोजा पडू शकतो.

कोणाला करता येतो अर्ज?

तुम्हाला जर लोन मोरेटोरियम हा पर्याय वापरायचा असेल तर तुम्हाला अर्ज करावा लागतो आणि आवश्यक ती कागदपत्रे, वैद्यकीय परिस्थिती उद्भवली असेल तर हॉस्पिटलची बिले, नोकरी गेली असेल तर तसे पत्र किंवा पगाराच्या पावत्या यासारख्या कागदपत्रांसोबत योग्य ती कारणे देखील द्यावे लागतात. तसेच तुमचे कर्ज खाते चांगल्या स्थितीत असणे गरजेचे आहे आणि मंजुरी ही प्रकरणानुसार दिली जाते.

लोन मोरेटोरियमचे फायदे आणि तोटे

लोन मोरेटोरियमचे फायदे जर बघितले तर तुम्हाला काही कालावधीसाठी कर्जाच्या हक्कांपासून दिलासा मिळण्यास मदत होते. लोन पॅनल्टी किंवा डिफॉल्टर म्हणून नाव येत नाही. नोकरी जाणे किंवा आजारपण किंवा उत्पन्नात घट यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत हा पर्याय फायद्याचा ठरतो. जर आपण या पर्यायाचे तोटे जर बघितले तर यामध्ये हप्ता थांबतो परंतु व्याज वाढतच राहते. कर्जाची मुदत वाढते व पर्यायाने हफ्ते देखील वाढतात. होम लोन सारख्या मोठ्या कर्जासाठी कालावधी लांबू शकतो. क्रेडिट कार्डची मर्यादा लिमिटेड होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe