तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि पाठिंब्यामुळे तालुक्यात विविध विकासकामे सुरू- आमदार किरण लहामटे

Published on -

अकोले- सर्वाच्या सहकार्याने व वैद्यकीय क्षेत्रातील मित्रांच्या सदिच्छेने माझी तालुक्यात विकासाची कामे सुरू आहेत. पर्यटन वाढीस प्रमुख ठरणारा आकर्षक रंधा फॉल येथे काचेचा पूल डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर देवीचा घाट फोडण्यासाठीचे काम मार्गी लावू, असा दावा आ. डॉ. किरण लहामटे यांनी केला.

अकोले तालुका मेडिकल असोसिएशनचे वार्षिक पारितोषिक वितरण २०२४-२५ व अंतरंग सांस्कृतिक कार्यक्रम मातोश्री मंगलकार्यालयात नुकताच पार पडला. यावेळी आ. डॉ. किरण लहामटे बोलत होते.

याप्रसंगी प्रसिद्ध सर्जन डॉ. नितीन बस्ते, के. एम. हॉस्पिटल संगमनेरचे संचालक डॉ. संदीप बोरले, डॉ. राजेंद्र म्हस्के, डॉ. सुशांत गिते, डॉ. सुवर्णा मेहेत्रे, डॉ. रूपाली शिंदे, के. एम. प्रशासकीय अधिकारी महेश वाव्हळ, वैद्यकीय अधिक्षक डॉ. बाळासाहेब – मेहेत्रे, पुष्पाताई लहामटे, मेडिकल – असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सखाराम – घनकुटे, सचिव डॉ. जयसिंग कानवडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी आ. डॉ. लहामटे म्हणाले, अकोले तालुका मेडिकल असोसिएशनला आत्मा हे शॉर्टकट नाव चांगले लाभले असून या आत्माचे अकोलेत उत्तम काम आहे. आत्माने अकोलेतील डॉक्टर्स व त्यांच्या परिवाराला व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.

याप्रसंगी प्रसिद्ध सर्जन डॉ. नितीन बस्ते यांनी अकोले तालुका मेडिकल असोसिएशनच्या सर्व सदस्यांची एकजूट प्रशंसनीय आहे. आत्माचे विविध कार्यक्रम व त्यात सर्व डॉक्टरांचा सहभाग प्रेरणादायी आहे. प्रत्येकाने एखादा छंद जोपासणे व त्याचा आनंद घेणे यातच जिवनाचे सार्थक आहे, अशी भावना व्यक्त केली. यावेळी अकोले तालुका मेडिकल असोसिएशनने वर्षभरात घेतलेया विविध स्पर्धांतील विजेत्याना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. डॉ. अनुप्रिता शिंदे व डॉ. सतीश वाळुंज यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी आत्माचे खजिनदार डॉ. रविद्र सावंत, क्रीडा सचिव डॉ. आकांक्षा पारधी, क्रीडा सचिव डॉ. मोहसिन शेख, सांस्कृतिक विभाग सचिव डॉ. मनिषा नाईकवाडी, सांस्कृतिक विभाग सचिव मच्छिद्र मंडलिक, डॉ. सोपान कवडे, डॉ. नुतन कडलक, डॉ. रविंद्र गोर्डे, डॉ. सुदाम आरोटे, डॉ. तेजस शहा, डॉ. शिवाजी वैद्य, डॉ. संदीप वामन, डॉ. सुधीर कोटकर, डॉ. सचिन हाडवळे, डॉ. दमयंती मुळे, डॉ. निलेश सहाणे, डॉ. संपत सांगळे आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!