अहिल्यानगर- समाजाच्या विकासासाठी महिलांना सक्षम करणे, त्यांच्यामध्ये महिलांना शिक्षण, आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक संधीमध्ये समान संधी मिळवून देणे हे गरजेचे आहे. तसेच सशक्त समाजासाठी महिला सबलीकरणाची गरज असून अशा कार्यशाळेचे आयोजन करणे गरजेचे आहे. विद्यापीठ व महाविद्यालय अशा कार्यशाळा घेत आहे त्याचा अभिमान आहे. असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले यांनी व्यक्त केले.
जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या अहिल्यानगर येथील मारुतरावजी घुले पाटील कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात आयोजित महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळेत त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे स्वागत व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गीत व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

यावेळी प्रमुख व्याख्यात्या डॉ. निलोफर धानोरकर यांनी मुलींच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व विशद केले. तोफखाना पोलीस स्टेशनच्या संपदा तांबे यांनी महिला हक्क संहिता विषयक नियम, कायदे, सुरक्षा या विषयी पीपीटी सादरीकरण करून मार्गदर्शन केले. न्यू लॉ कॉलेजच्या प्रा. प्रियांका खुळे यांनी समाजात महिलांना समान संधी, सन्मान व आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, महिला सुरक्षिततेचे अधिकार व उपाय योजनेबाबत माहिती दिली.
या कार्यशाळेला तेजस्विनी क्षितिज घुले पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी प्रशासकीय अधिकारी के.वाय.नजन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.के. पंदरकर, उपप्राचार्य डॉ. के. आर. पिसाळ, कला शाखाप्रमुख प्रा. एस.व्ही.मरकड, संस्था समन्वयक विजय काशीद, काकासाहेब म्हस्के उच्च माध्यमिक विद्यालय, मुख्याध्यापिका – शितल बांगर, काकासाहेब म्हस्के प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा तनपुरे, महिला पोलिस नाईक अहिल्या गलांडे, नितीन म्हस्के उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन महिला तक्रार निवारण समिती प्रमुख प्राध्यापिका व्ही. एस. पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पुनम खरड व प्रा.एस.जे.वाघ यांनी केले. व आभार प्रदर्शन प्राध्यापिका आर. एस. थोरात यांनी मानले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापिका एस.एस.पुंड, एस.ए.निमसे, के.एस. कराड, एन.आय.शेख, व्ही.बी.लबडे, ए.एच. लहाडे, एस.आय.शेख, शेख मॅडम, मनीषा जीवडे, श्यामा वाळके, ऋतिक ताकपेरे यांचे सहकार्य मिळाले.