नागपंचमीनिमित्त जामखेडमध्ये रंगला कुस्त्यांचा थरार, अतीतटीच्या लढतीत पै.कालीचरण सोनवलकर यानी पटकावली मानाची गदा

Published on -

जामखेड- नागेश्वराच्या पावन भूमीत सालाबादप्रमाणे कै. विष्णू (उस्ताद) काशीद बाबा यांच्या स्मरणार्थ जामखेड येथे आयोजित केलेल्या विराट निकाली कुस्त्यांचे मैदान यशस्वीरित्या संपन्न झाले. यात पै.सतपाल सोनटक्के विरुद्ध पै. कालीचरण सोलनकर यांच्यात झालेल्या मानाच्या गदेसाठी अंतिम कुस्तीमध्ये पै. कालीचरण सोनवलकर यानी मानाची गदा पटकावली.

यानंतर नावाजलेले पै. भैया धुमाळ (अकलूज) विरुद्ध पै. फैयाज हुसेन (इंदोर) यांच्यामध्ये अटीतटीच्या कुस्तीत पै. भैय्या धुमाळ विजयी झाला. यासोबतच परिसरातील नावाजलेल्या पैलवानांच्या कुस्त्या या ठिकाणी कुस्ती शौकिनांना पाहायला मिळाल्या.

या कुस्ती मैदानासाठी उद्घाटक विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून हभप महादेवानंद भारती महाराज (अश्वलिंग संस्थान पिंपळवंडी), श्री श्री १००८ महामंडलेश्वर नितीनदास महाराज, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप, मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, रवींद्र सुरवसे, शरद कारले, गौतम उत्तेकर, बापूराव ढवळे, संजय काशिद, सचिन घुमरे, गणेश जगताप, विष्णू भोंडवे, महारुद्र महारणवर, विनोद उगले, सुभाष काळदाते, केशव वणवे, कांतिलाल वराट, काकासाहेब चव्हाण, आप्पा मुरूमकर तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदरच्या स्पर्धा पै.बबन काशिद (उपमहाराष्ट्र केसरी तथा अध्यक्ष मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन महाराष्ट्र) युवराज काशिद यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. दुपारी सुरू झालेले मैदान रात्री ९ पर्यंत सुरू होते. कुस्तीवर प्रेम करणारा रसिक प्रेक्षक वर्ग शेवटपर्यंत मैदानामध्ये बसून होता शेवटची कुस्ती संपेपर्यंत प्रेक्षकांनी मैदान सोडलेच नाही. या कुस्ती मैदानाचे समालोचन प्रा. हंगेश्वर धायगुडे यांनी केले.

जामखेडची पंचमी आता कुस्त्यांची झाली जामखेडची पंचमी ही पूर्वी काळी नाच गाण्यासाठी प्रसिद्ध असायची, अलीकडच्या काळातील या कुस्ती मैदानामुळे तिची जुनी ओळख पुसून कुस्त्यांची जामखेडची पंचमी अशी ओळख होत आहे. परिसरातील सर्व लहान मोठ्या पैलवानांना या मैदानामुळे चांगले व्यासपीठ मिळते. तयारी करण्यास वाव मिळतो, अनुभव मिळतो. व हाच अनुभव जिल्हा, राज्य व देश स्तरावरील कुस्ती स्पर्धांसाठी कामी येतो.

दरवर्षी मी या मैदानाला हजर असतो

अॅड. अजय काशीद आणि काशीद कुटुंबाच्या वतीने या कुस्ती मैदानाचे यशस्वीरित्या आयोजन केले जाते. ही जामखेडकरांसाठी आनंदाची बाब आहे. या कुस्ती मैदानामध्ये यापूर्वी ही नावाजलेल्या मल्लांच्या कुस्त्या झालेले आहेत. अजय काशीद हे ग्रामीण भागातील मल्लांना हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे चांगले काम दरवर्षी करतात. – सभापती प्रा. राम शिंदे

अजय काशीद यांनी भाजपा पक्ष संघटनेमध्ये महत्त्वाची पदे यशस्वीपणे सांभाळत, आपल्या नेतृत्वाची चुणूक पक्षश्रेष्ठींना दाखवली आहे. समाजकार्याची विविध कामे ते आवडीने करत असतात. आदर्श गाव सारोळ्याचे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध सरपंच म्हणून ते चांगले काम पाहत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सारोळा शाळेने मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेमध्ये मागील सलग दोन वर्ष अहिल्यानगर जिल्ह्यात सर्व द्वितीय क्रमांक मिळवत पाच लाखाचे बक्षीस मिळवले आहे. गेल्या २३ वर्षापासून वडील स्व. विष्णू उस्ताद काशीद (बाबा) यांच्या स्मरणार्थ भव्य कुस्ती मैदानाचे यशस्वी यशस्वीपणे आयोजन करण्यात ते आणि त्यांचा मित्रपरिवार आघाडीवर असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!